top of page

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास  महामंडळ

   विविध कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी )

  • प्रकल्प मर्यादा रु . ३ लाख पर्यंत

  • व्याजदर (वार्षिक) ५०,०००/- पर्यंत ५%

      ५०,०००/- वरील ६%(स्त्री लाभार्थींना १% सूट अनुज्ञेय आहे. )

  • मंजुरीचे अधिकार - व्यवस्थापकीय संचालक , मुंबई .

   दीर्घ मुदती कर्ज योजना

  • प्रकल्प मर्यादा खरेदी / विक्री व्यवसाय रु .३ लक्ष पर्यंत

  • सेवा व्यवसाय ५ लाखा पर्यंत           लाभार्तींचा सहभाग - ५%

  • राज्य महामंडळाचा सहभाग - ५%    परतफेडीचा कालावधी  - १० वर्षे .

  • वार्षिक व्याज - पुरुषांसाठी ६ %       मंजुरीचे अधिकार NHFDC

  • वाहतूक व्यवसायासाठी वाहन कर्ज योजना

  • प्रकल्प मर्यादा रु . १० लाख पर्यंत

  • लाभार्थींचा सहभाग - ५%

  • वार्षिक व्याजदर - पुरुष ६%,महिला - ५%, रु . ५ लाखापर्यंत व त्यापेक्षा जास्त ७%

  • राज्य महामंडळ - ५%

  • परतफेडीचा कालावधी - १० वर्षे

  • मंजुरी अधिकार NHFDC

  • मुख्य अट - अर्जदाराच्या पहिल्या नातेवाईकाच्या नावे कायमस्वरूपी वाहन परवाना आवश्यक . ट्रेक्टरसाठी लाभार्थींच्या नवे किमान ८ एकर जमीन असावी .

 

  • महिला समऋद्धी योजना

  • अपंग महिलांना उप्रोल्लोखित  राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांमध्ये महिला समृद्धी योजनेंतर्गत १% सूट व्याजदरांमध्ये दिली जाते .

  • रु . ५०,००० /- पर्यंत ४% दराने , रु . ५०,००० ते ५ लाख पर्यंत ५% दराने तर

  • कर्जमंजुरी प्रक्रियेत महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते

  • इतर अति व शर्थी सर्वसामान्यांप्रमाणे लागू .

  • सूक्ष्म-पतपुरवठा योजना

  • नोंदणीकृत अशासकीय संस्थानमार्फत स्वयंसहाय्यता बचत गटास कर्जपुरवठा करणेसाठी संस्थेला रु . ५ लाखपर्यंत कर्ज नोंदणीकृत संस्थेला सभासदांसाठी थेट कर्ज

  • संस्था बचत गटातील कमीत कमी २० सदस्यांना जास्तीत जास्त रु . २५,००० /- पर्यंत कर्ज देऊ शकते . तथापि , जास्तीत जास्त सभासदांना कर्ज वितरीत करणे अपेक्षित आहे.

  • लाभार्थींना ५% दराने व्याज आकारले जाते .

  • परतफेडीचा कालावधी ३ वर्षे

    शैक्षणिक कर्ज योजना

  • आरोग्य विज्ञान , अभियांत्रिकी , डी . एड . व बी . एड .व्यवस्थापन व संगणक अथवा तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रम करिता परिषदांची मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थांमार्फत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी .

  • संपूर्ण अभ्यास्क्रमासाठी रु . १० लाखापर्यंत (देशांतर्गत) व रु . २० लाक्ष्पर्यंत (परदेशात)

  • कर्जावर ५०,००० /- पर्यंत ५% ५०,००० ते ५ लक्ष -६% , त्यापेक्षा जास्त ७%, महिलांना १% सूट शिक्षण पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर  ७ वर्षात परतफेड .

    • राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना

  • उद्देश मुख्यत्वे कमी , भांडवलात व्यवसाय सुरु करणे .

  • कर्जाची कमाल मर्यादा रुपये २० हजार

  • व्याजाचा दरसाल दर शेकडा २%

  • परतफेडीचा कालावधी मासिक / तैमासिक ३ वर्षे

  • उत्पन्नाची मर्यादा १ लाखापर्यंत

  • वय मर्यादा १८ ते ५५ वर्षे इतर अर्हता  या माहितीपत्रकात इतर योजनांसाठी उल्लेखल्याप्रमाणे .

      अर्जदार लाभार्थींची अर्हता:

  • लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा .

  • महाराष्ट्राचा रहिवास १५ वर्षपासून असावा .

  • त्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे .

  • तो कोणत्याही बँकेचा , महामंडळाचा किंवा वित्तीय संस्तेचा थकबाकीदार नसावा .

  • ग्रामीण भागातील  अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु . ३ लाख रुपयापेक्षा कमी असावे , तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु .५ लाख रुपयापेक्षा कमी असावे .

  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल , त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किवा अनुभव असावा .

  • कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील .     

मानसिक विकलांग (मनोरुग्ण), सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न (ऑटीझम)

अशा अपंगांसाठी स्वयंरोजगार योजना

  • कर्ज मर्यादा - रुपये १० लाख

  • कर्ज देताना त्यासठी कराव लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येत नसल्यामुळे त्यांना खालील व्यक्ती मार्फत कर्ज मिळवता येईल .

  • . मनोरुग्णाचे आई - वडील

  • . मनोरुग्णाचे सहचार (पत्नी किंवा पती )

  • . कायदेशीर पालक

  • मतीमंद व्यक्तीच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना

  • प्रकल्प मर्यादा कमल रु . ५ लक्ष पर्यंत

  • पालक संस्थेची नोंदणी निदान ३ वर्षे आवश्यक

  • कर्ज परतफेडीचा कालावधी : १० वर्षे

  • सुरक्षा - एकूण मंजूर रकमेचा २५ % रक्कम , NHFDC  च्या नावे मुदत ठेव स्वरुपात तारण तारम किंवा ४०% रक्कम साम्पास्छिक , (collateral security ) सुरक्षा

  • अशासकीय संस्तेचा सहभाग - प्रकल्प किमतीच्या ५%

  • संस्थेमध्ये कमीत कमी दर : रु . ५० हजारापर्यंत ५%, रु. ५० हजाराच्या वर ते रुपये ५ लाखापर्यंत ६%

अपंग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी / होर्टी कल्चर योजना

  • प्रकल्प मर्यादा रु. १० लक्ष पर्यंत

  • लाभार्थींचा सहभाग - ५%

  • राज्य महामंडळ - ५%

  • परतफेडीचा कालावधी - १० वर्षे

  • मंजुरी अधिकार NHFDC 

  • वार्षिक व्याजदर - पुरुष ६%, महिला ५% रु . ५ लाखापर्यंत व त्यापेक्षा जास्त ७% 

  • कर्जमागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • मुळग विहित नमुन्यांतील अर्ज पुर्णत:  भरलेला

  • १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव केल्या बाबतचा दाखला / डोमेसाईल सर्टर्फिकेट()

  • वयाचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला ( वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे )

  • अपंगत्वाचा दाखला (ग्रामीण भागासाठी तलाठी / शहरी भागासाठी तहसीलदार)

  • अनुभवाबाबत प्रमाणपत्र

  • निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत

  • पासपोर्ट साईझ व पूर्ण आकाराचे फोटो (अर्जावर चिटकाविण्यात  यावेत)

  • जातीचे प्रमाणपत्र

  • जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वताच्या मालकीची /भाड्याची /भाडे पावती , विशिष्ट मुदतीचे भाडे कार्रार्पत्रक इ.)

 

  • मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना -

  • ५०% अनुदान योजना 

  • प्रकल्प मर्यादा रु . ५०,००० /- पर्यंत .

  • प्रकल्प मर्यादेच्या ५०% किंवा जास्तीत जास्त रु . १०,०००/- पर्यंत अनुदान देण्यात येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते . बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते . कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे ३ वर्षात करावयाची आहे .

 

  •  प्रशिक्षण योजना 

  • जातीच्या लाभधारकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थेमार्फत (६ महिन्यांपर्यंत ) मोफत प्रशिक्षण देण्यात येते . उदा .टी.व्ही. रीपेयरिंग , फ़ेब्रिकेशन / वेल्डिंग , इलेक्ट्रिशन, वाहन दुरुस्ती , मोटार मेकानिक , वाहन चालक , शिवणकला , संगणक , ब्युटी पार्लर , होम अप्लायन्स , मोबाईल रीपेयरिंग , फोटोग्राफी , व्हिडीओ शुटींग , सिक्युरिटी गार्ड , फैशन डिझाईनिंग , टर्नर फिटर , रेफ्रिजरेशन प्लंबर , ऑटोमोबाईल, रीपेयरिंग (३ व्हीलर / ४ व्हीलर), स्प्रे पेंटिंग इत्यादी विद्यावेतन खालील प्रमाणे (प्रतीप्रशिक्षणार्थी प्रतिमाह)

  • . स्थानिक प्रशिक्षणार्थ्यास रु . १५०/-

  • . महानगरपालिका क्षेत्रात रु . २५०/-

  • . बाहेरगावी प्रशिक्षण असल्यास रु . ३००/-

  • . प्रशिक्षण फ्री प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना महामंडळामार्फत देण्यात येते .

     

बीज भांडवल योजना 

  • महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधुन बीज भांडवल योजना राबविण्यात येते .योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे .

  • . प्रकल्प मर्यादा रु . ५०,००० /- ते रु . ५ लाखापर्यंत .

  • . प्रकल्प मर्यादेच्या २०% बीज भांडवल कर्ज महामंडलामार्फत ४%  द.सा.द .शे. व्याजदराने देण्यात येते .

  • सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान रु . १०,००० /- चा समावेश आहे .

  • . बँकेचे कर्ज ७५% देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियामाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो .

  • . महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षाचे आत करावी लागते .

  • . अर्जदारास ५ % स्वत : चा सहभाग भरावयाचा आहे .

  •  

  •  

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.)

  मुदती कर्ज योजना 

  • प्रकल्प मर्यादा रु . ५ लाख

  • एनएसएफडीसी यांच्या मुदती कर्जामध्ये महामंडळाकडून २०% बीज भांडवल ४% व्याज दराने दिले जाते त्यामध्ये रु . १०,००० /- पर्यंत अनुदाणाचाही समावेश आहे .

  • अर्जदाराचा सहभाग ५% आसतो .

  • एनएसएफडीसीच्या कर्जावर  ६% व्याजदर आकारण्यात येतो .

  • कर्जाची परतफेड ५ वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे .

  • महामंडळा मार्फत दिले जाणारे बीज भांडवलावर ४% व्याज आकारण्यात येते .

  • एकूण तरतुदीच्या १०% रक्कम रु . ५ लाखा पुढील व रु . ३० लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी उपयोग केला जातो व त्यावर ८% व्याज आकारले जाते . 

  • सिड भांडवल योजना

  • अर्जदारास बँकेमार्फत रु . ५० लाखापर्यंत कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रकल्प किमतीच्या २०% किंवा जास्तीत जास्त रु . १० लाख सिड कपीटल एनएसएफडीसी मार्फत वितरीत करण्यात येते . बँके मार्फत मंजूर प्रकरणात मंजुरी एनएसएफडीसीकडे पुरस्कृत करण्यात येतात व त्याच्या कडून मंजुरी व निधी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येते .

  • सुक्ष्मपतपुरवठा 

  •  या योजनेंतर्गत रु. ३०,००० /- पर्यंत कर्ज देण्यात येत असून प्रकल्पाच्या ५०% मात्र जास्तीत जास्त रु. १०,०००/- पर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो . कर्जावर ५% व्याज आकरण्यात येत असून कर्जाची परतफेड ३ वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे .

  • महिला समृद्धी योजना 

  • महिलांना या योजनेंतर्गत रु. ३०,०००/- कर्ज देण्यात येत असून प्रकल्पाच्या ५०% मात्र जास्तीत जास्त रु . १०,०००/- अनुदान देण्यात येते . व्याजदर ४% आकारण्यात येत असून कर्जाची परतफेड ३ वर्षात करावयाची आहे .

  • महिला किसान योजना 

  • या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना रु. ५०,००० /- पर्यंत कर्जाचा लाभ देण्यात येतो . दारिद्र रेषेखालील महिलांना कर्जाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त रु. १००००/- अनुदान देण्यात येते . या योजनेंतर्गत एन.एफ.डी.सी. कडून कर्जाच्या ९०% अर्थसहाय्य देण्यात येते व त्या रक्कमेवर ५% व्याज आकारण्यात येते . कर्जाची परतफेड १० वर्षात करावयाची आहे. या योजनेंतर्गत फळे , भाजीपाला , फुले उत्पादन करणे , बाग बागीचा , धान्य , कडधान्य , तेलबिया इ . शेतीपासून उत्पादन करणारे व्यवसायांना कर्ज दिले जाते . हि योजना दि . ०१-०५-२००८ पासून सुरु करण्यात आलेली आहे .    

  • उच्च शैक्षणिक कर्ज योजना 

  • एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजनेंतर्गत देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्याकरिता रु . ७. ५० लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे , तसेच देशाबाहेर रु. १५. ०० लाखापर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे . व्याजदर द.सा.द.शे. ४% व्याजदर आकारव्याचा आहे . तसेच स्त्री लाभ धारकांनकरिता द.सा.द.शे.४% व्याजदर आकारवयाचा आहे

  •  

  • . राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना - (एन.एस.के.एफ.डी.सी) -

  • केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर , अस्वच्छ काम करणाऱ्या सफाई कामगारांचे व त्यांचेवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे . त्यांत विविध व्यवसाय करणेसाठी रु. १०. ०० लाख कमाल मर्यादेपर्यंत कर्ज देण्यात येते .

 

bottom of page