top of page

ग्रामीण भागासाठी शासनाच्या योजना

ग्रामपंचायती साठी योजना

प्रोत्साहन व पुरस्कार

मुल्स्थानी मृद व जलसंधारण

- सर्व क्षेत्रावर पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुराविण्याचे उद्दिष्ट्य

- गाव मोठ्या / मध्यम प्रकल्पाचे लाभ क्षेत्राबाहेरील असावे .

- मंडळ कृषी अधिकारी एका गावाची निवड करण्यात येईल .

- पुरस्कार जिल्हा , विभाग , राज्य सत्र

- संपर्क - मदल कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / उपविभागीय कृषी अधिकारी .

२) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

- गावामध्ये ग्रामस्वच्छता चळवळ राबवि म्हणून

- सर्व ग्रामपंचायती सहभागी होऊ शकतात .

- २ ऑक्टोबर - २६ जानेवारी - अभियानात भाग घेत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सादर .

- २ ऑक्टोबर - सर्व ग्रामपंचायती मधून एकाच वेळी ग्रामसभेचे आयोजन .

- ग्रामपंचायतीचे 'अ' , 'ब' , 'क' वर्गीकरण - 'अ' प्रकारी मिळालेल्या ग्राम पंचायतीचे पुरस्कारासाठी पात्र असतील .

- पंचायत समिती , जिल्हा स्तरावर , विभागीय राज्य पुरस्कार , पंचायत समिती प्र . २५ हजार , द्वि - १५ हजार  , तृ . १० हजार  ,   

जिल्हा स्तर - प्र . ५ लाख , द्वि - ३ लाख , तृ . २ लाख ,

विन्हागीय - प्र. १० लाख , द्वि , २० लाख , तृ . १५ लाख .

 

३. महात्मा गांधी स्वछ जिल्हा परिषद व पंचायत समिती .

निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त -

पंचायत समिती - ४ लाख

जिल्हा परिषद - २० लाख

 

४. आमच्या गावात आम्ही सरकार खालील ग्रामपंचायतीसाठी  पात्र

१. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळवलेली ग्रामपंचायत

२. जलस्वराज्य प्रकल्पात निवड झालेली .

३. निर्मलग्राम / हागणदारी मुक्त

४. ग्रामपंचायतीच्या हद्दीत किमान एक पाणलोट क्षेत्र पूर्ण केलेली .

५. यशवंत ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी . 

प्रत्येक ग्रामपंचायतीस रु .५०,०००/- अंमल वाढीसाठी . 

सर्वकष विकास आराखडा राबवण्यासाठी रु . १० लाखापर्यंत प्रोत्साहन निधी .

- १५% लोकवर्गणी

- संपर्क - पथकप्रमुख , जलस्वराज्य प्रकल्प

५. ग्रामपंचायतीन ४० लाखांचा निधी

- राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रोत्साहन .

- ४० लाख रुपयांचे काम करण्यासाठी लक्ष्य दिले आहे .

- ग्रामविकास विभ्गाक्डून कामाचा आराखडा .

- वृक्षारोपण , जवाहर विहीर . गावांतर्गत रस्ते , तलाव व पाझरतलाव , विहिरीतील गाळ वैयक्तिक विहीर इ . कामे.

- निधी - गावांतर्गत रस्ते - १० लाखांपर्यंत

रोपवाटिका - २ लाखांपर्यंत

गाळ  काढणे - १० लाखापर्यंत

वृक्षारोपण - ४ लाखांपर्यंत

ग्रामपंचायत इमारत

'' राजीव गांधी पंचायत भवन ''

- संपर्क - गटविकास अधिकारी / तहसीलदार .

५. निर्मलग्राम (हागणदारीमुक्त गावे) पुरस्कार

- शौचालयाचा वापर करणार्या ग्रामपंचायती , समिती व जिल्हापरिषदांना

- पुरस्कार -

ग्रामपंचायत - लोकसंख्या १००० पर्यंत - रु. १ लक्ष

१०००-१९९९ - २ लक्ष

२००० - ४९९९ - रु. ४ लक्ष

५००० - ९९९९ - रु. ८ लक्ष

१००० - ४९००० - रु. १५ लाख

५०,००० पेक्षा जास्त  २० लाख .

जिल्हा - १० लाखांपेक्षा लोकसंख्या - ३० लाख

१० लाखापेक्षा जास्त - ५० लाख

संपर्क :-

निर्मलग्राम ग्रामपंचायतींना अनुदान

- निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना प्रोत्साहन म्हणून अनुदान .

- अनुदान - २००० लोकसंख्या - २ लाख , २००० पेक्षा अधिक - ७ लाख .

पात्रता - १. निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त .

२. जलस्वराज्य प्रकल्पात निवड .

३. १०० % पाणीपट्टी  वसुली .

४. पाण्याची तपासणी व अहवाल .

 

६. महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम .

- किरकोळ भांडणे , तणाव गावपातळीवरच मिटविणे .

- तंटे होऊ नयेत म्हणून प्रयत्न .

-दिवाणी , महसुली व फौजदारी

- महात्मा गांधी तंटामुक्त गावसमिती स्थापन करावी .

- २०० गुणांपैकी १५० गुण मिळवणारी गावे तंटामुक्त .

- अहवाल समितीचे ध्यक्ष व निमंत्रक पोलिस ठाणेप्रमुख व तहसीलदार यांना सादर करतील .

- पुरस्कार

लोकसंख्या

१००० पर्यंत - रु. १ लक्ष

१ - २००० - रु. २ लक्ष

२००० - ३००० - ३ लक्ष

३००० - ४००० - ४ लक्ष

४००१ - ५००० - ५ लक्ष

५००० - १००० - ७ लक्ष

१०,००० व अधिक - १० लक्ष .

 

७. संत तुकाराम वनग्राम योजना .

- वनसंरक्षण अवैध वृक्ष व वन विनाशास आळ , वनांचे व्यवस्थापन समित्यांसाठी स्पर्धा

- जिल्हा व राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार .

- जिल्हा - प्र - २५०००/- द्वि . १५००/- तृ. ७५००/-

- राज्य - १० लक्ष - ५ लक्ष - ३ लक्ष

संपर्क - विभागीय वन अधिकारी / उपसंचालक - सामाजिक वनीकरण जिल्हा / तालुका कृषी अधिकारी .    

८. यशवंत पुरस्कार

उत्कृष्ट प्रशासनासाठी

- जिल्हा परिषद -पंचायत समिती व ग्रामपंचायतीस राज्यस्तर जि . प . - प्र . २५ लक्ष , द्वि . १५व लक्ष तृ . १० लक्ष

पंचायत समिती - प्र . १५ लक्ष द्वि . १२ लक्ष तृ . १० लक्ष

ग्रामपंचायती - प्र . ७ लक्ष द्वि . ५ लक्ष तृ. ३ लक्ष

विभागीय - प. स - प्र १० लक्ष , द्वि. ७ लक्ष , तृ . ५ लक्ष

ग्राम - प्र . ३ ल , द्वि . २ लक्ष , तृ . १ लक्ष

संपर्क -

 

आदर्श गाव -- गावच्या विकासासाठी विविध १२ विभागांच्या ५५ योजना

- पात्रता - १. ओलिताखाली क्षेत्र ३० % अधिक नसावे .

२. लोकसंख्या ४००० पेक्षा अधिक नसावी .

३. ग्रामविकास निधी उभारून वापरण्याची तयारी .

४. ग्रामसभेच्या ठराव + विडीओ चित्रीकरण .

५. कार्यकर्ता , तांत्रिक कार्यकर्ता यांची निवड .

 

१०. पर्यावरण संतुलित / इकोविलेज

- गावांमध्ये पर्यावरण संतुलित समृधीचा भंग .

- गावठाण व शिवार यांच्या विकास .

- नैसर्गिक घटकांचा - सौर , पवनउर्जा , वाहने , पाणी , पाण्याचे स्त्रोत .

- घनकचरा व्यवस्थापन .

- ग्रामसभेस ठराव .

संपर्क - गटविकास अधिकारी .

- अनुदान - तीन वर्षे .

- पात्रता - १. लोकसंख्येइतकी वृक्षलागवड

२. निर्मलग्राम (हागणदारी मुक्त )

३. घरदारी व पाणीपट्टी वसुली

४. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता / यशवंत अभियानात चांगले काम .

- उत्कृष्ट काम करणाऱ्यांस ग्रामपंच्यायतींना विकासक पुरस्कार .

 

११. मोठ्या ग्रामपंचायतींना अनुदान

५००० इन अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी अनुदान .

- बाजारपेठांचा विकास , दिवाबत्ती . विद्यार्थी अभ्यास केंद्र , इ .

- दरवर्षी २५ लक्ष - आणि पाच वर्षात जास्तीत जास्त १ कोटी अनुदान

- जिल्हा नियोजन मंडळास अधिकार - पर्यावरण संतुलित योजनेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य .

- २५ % ग्रामपंचायतीचे योगदान ७५ % राज्य शासन .

- संपर्क - मुख्य कार्यकारी , अधिकारी , जिल्हा परिषद .

१२. राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान -

- महिला व बालविकास विभागाबाकी ३३ जिल्ह्यांमध्ये

- गावपातळीवर काम करणार्या व्यक्ती , संस्था , अंगणवाडी व ग्रामपंचायत यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन .

- आदिवासी क्षेत्रात - कुपोषणमुक्त प्रत्येक बालक रु. २००० /- व गावास रु. १०,०००/-

- आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त - प्रती बालक रु . १०० /-

गाव - रु . १०००/-

- प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट कुपोषणमुक्त पहिल्या तीन गावना - प्रथम १ लक्ष , द्वितीय - ५० हजार , तृतीय - २५ हजार .

संपर्क - ?

 

१३. खासदार आदर्श ग्राम योजना

- प्रत्येक खासदाराने स्वतः च्या मतदार संघातील १ गाव दत्तक घेऊन २०१९ पर्यंत गावच्या संचालक पायाभूत विकासाची जबाबदारी स्वीकाराची .

- आदर्श गाव योजना राबवणे .

- शेतकर्यांना सोइल हेल्थ (मृदा आरोग्य) कार्ड , गावकर्यांना आधार .

- आदर्श शाळा , आर्थिक अजेंडा , स्वच्छता , आंगणवाडी , वृक्षारोपण , आरोग्य सुविधा .

 

१४. निर्मलग्राम पंचायतीना अनुदान

- ज्या ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत . त्यांच्या प्रोत्साहनपर

- पुरस्कार - २ हजार लोकसंख्या - २ लक्ष

२ हजारपेक्षा अधिक - ७ लक्ष

- ग्रामस्वच्छता , पाणी , घनकचरा , सांडपाणी , शाळा इ . साठी खर्च .

- संपर्क -

जलसंधारणाच्या योजना

 

1) महात्मा फुले जल अभियान

- पावसाचे पाणी अडवणे व निरवणे .

- पडीक जमिनींचा विकास व रोजगार निर्मिती .

लाघुपाट बंधारे प्रकल्प पाण्याचे स्त्रोत बळकट करणे .

- ग्रामसभेत ठराव - पाणीवाटप संस्था स्थापन करणे , कामाची चर्चा - विहीर , लघुबंधारे , पाणलोट प्रकल्प इ .

- संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत या अभियानाबाबत प्राधान्य .

- संपर्क - गटविकास अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / प्रकल्पसंचालक - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा . 

२) जलस्वराज्य प्रकल्प

- शुद्ध पाण्याची उपलब्धता , स्वछ जल .

- गुण विभागणी - साध्याची पाण्याची उपलब्धता - २५ गुण , पाणी   अशुद्धता - २५ , दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या - १० गुण , पाणीपट्टी वासुलि - ५ गुण  .

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता , शिवकालीन पाणी , म. फुले जल अभियान , यशवंत इ . योजनेतील सहभाग - ५ गुण .

भूजल - अधिनियमन - १० गुण .

ग्रामपंचायतींनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे गावाची निवड करून फायदे दिले जातात.

- ग्रामीण पाठपुरवठा , ग्रामस्वच्छता , महिला सबलीकरण तीन अंगे .

- संपर्क - पथकप्रमुख - जलस्वराज्य प्रकल्प .

 

३) लघुपाटबंधारे योजना -

- जिल्हा लघुपाटबंधारे विभाग

- सिंचनक्षमता विकसित करून लाभार्थ्याचे उत्पन्न वाढवणे .

- संपर्क - गटविकास अधिकारी कार्यकारी अभियंता . मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद .

४) स्वजलधारा योजना

- ग्रामसभेमध्ये ठराव होणे आवश्यक - ग्रामसभेत किमान ४०% नागरिकांची उपस्थिती आवश्यक - महिला ग्रामसभेतही ठराव .

- ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती .

- ५०% महिला व ५०% पुरुष

- तांत्रिक सल्लागाराची निवड .

- तीन हप्त्यात मदत -

दुसरा हप्ता गाव निर्मल झाले तरच

तिसरा हप्ता तीन महिन्यांची आगाऊ पाणीपट्टी वसूल झाल्यावर .

संपर्क - कार्यकारी अभियंता , ग्रामीण पाणीपुरवठा विभाग , जिल्हा परिषद .

 

५) महाजल

- ग्रामीण भागास नळाने पाणी पुरवठा करणे

- ग्रामसभेत ठराव - किमान ४०% नागरिकांची उपस्थिती आवश्यक .

- ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती .

- संपर्क - उपभियांता - पाणीपुरवठा उपविभाग .

 

६) आदिवासी क्षेत्रात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ठराव ग्रामसभेत ( ४०% नागरिकांची  उपस्थिती )

- संपर्क - उपअभियंता , पाणी पुरवठा  विभाग .

 

७) बिगर आदिवासी क्षेत्रात नळ पाणी पुरवठा .

- संपर्क - उपअभियंता , पाणी पुरवठा .

 

८) आदिवासी क्षेत्र - विहीर

- गाव / पाड्यात विहीर खोदणे .

- ठराव ग्रामसभेच्या (४०% नागरिकांची उपस्थिती )

- संपर्क -  उपअभियंता ,पाणी पुरवठा .

 

९) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना .

- राज्यातील गावे तंटामुक्त करण्यासाठी

- पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि स्त्रोत बळकट करणे .

- ग्रामसभेत ठराव .

- मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद .

मंजुरीचे अधिकार -

कार्यकारी अभियंता , जि. प - ५० लक्ष .

अधीक्षक अभियंता - ५० लक्ष ते २. ५० कोटी .

मुख्य अभियंता , ग्रामीण पाणीपुरवठा , राहय - ५ कोटी .

 

१०) बंद पाणी पुरवठा .

- ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच .

- ग्रामपंचायतीच्या वीजथकबाकी संदर्भात -

वीजबिलामुळे बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत .

- ग्रामपंचायत ५०% - ६ महिन्यांचे हप्ते . संपूर्ण व्याज माफीचा लाभ .

-संपर्क - पंचायत समिती .

 

११) शाश्वत लघुनळ पाणी योजना

- राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत दुहेरी हातपंप योजना

- ज्या गावात / वस्तीवर विहिरीची पाणीपुरवठा क्षमता ताशी २८०० लि . आहे व बारमाही पाणी उपलब्ध आहे , अशा विहिरींवर विंधन विहिरींवर सममर्सिब्ल  पंप बसवून , ५००० लि . क्षमतेच्या टाकीत पाणी साचवून .

संपर्क - भूजल सर्वेक्षण व विकासयंत्रणा .

 

१२ ) म . रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर .

- वैयक्तिक विहीर खोदण्यासाठी अनुदान

- शेतकरी मागासवर्गीय - दारिद्र्य रेषेखालील अल्पभूधारक (५ एकापेक्षा कमी जमीन )

- ६०% काम मजुरामार्फत ४०% यांत्रिक पद्धती काम करता येईल .

- कुटुंबातील माणसे तसेच जॉबकार्डधारक इतर शेतकरी काम करू शकतात .

- विहिरीतील गाळ काढण्याची सुद्धा परवानगी

- संपर्क - पंचायत समिती / गटविकास अधिकारी .

 

१३) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार यंत्रणे अंतर्गत शेतकरी .

- अनुसूचित जाती / जमाती / अल्पभूधारक व सीमांत शेतकरी

-  ग्रामपंचायत व ग्रामसभेची मान्यता .

- लाभार्थ्याकडे जमीन असणे आवश्यक / कुळाची असल्यास सर्व कुळाची संमती .

- शेतकरी जॉबकार्डधारक असला पाहिजे .

-संपर्क - तालुका कृषी अधिकारी .

 

१४) जवाहर विहीर कार्यक्रम

- शेतात विहीर खोदणे

- लाभार्थ्याकडे किमान ०. ७ हेक्टर सलग जमीन असणे. आवश्यक / सामुदायिक जमिनींवर शक्य .

- संपर्क :- तालुका समन्वय समिती .

 

१५) नागरी दलित वस्तीत पाणी योजना

- नागरी भागातील दलित वस्तींना पाण्याची सोय

- नागरी स्वराज्य संस्था ९०% अनुदान

-लोकवर्गणी - १०%.

-अनुदान - महापालिका - ३२ लक्ष .

                 'अ' नगरपरिषद - १५ लक्ष .

                 'ब' नगरपरिषद - १२ लक्ष. 

                 'क' नगरपरिषद - १० लक्ष .  

- संपर्क - जिल्हाधिकारी .

१६) जलयुक्त शिवार

- दुष्काळी परिस्थितीवर मत करण्यासाठी

- पाणी साठवण क्षमता वाढवणे , जल्स्त्रोतांची क्षमता वाढवणे बंधारे , तलाव , पाझरतलाव विकसित करणे .

- मुख्यमंत्री निधी , आमदार निधी इ . मदत .

- संपर्क - विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी .

कृषी, जलसंधारण , जिल्हा परिषद .

 

स्वच्छता

 १. संपूर्ण स्वछता अभियान .

- गावातील स्वच्छतेचे स्वरूप सुधारणे .

' स्वच्छता दूत' तयार करणे , घराघरात शौचालय .

२. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता

३. निर्मलग्राम पुरस्कार व अनुदान .

४. वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान

- स्वछ भारत मोहिमेअंतर्गत

- रु. १२,०००/- अनुदान

- संपर्क - ?

प्रशासन

१. ग्रामसचिवालय

- तालुका व जिल्हा पातळीवरील कार्यालये गावागावात उघडावीत व गावकर्यांचे हेलपाटे वाचावेत .

- गावात सचिवालय इमारत उभारून एकाच ठिकाणी सर्व कार्यालये .

- इमारतीस साधारण १५ लक्ष खर्च

- ग्रामपंचायतीचे उत्पन्न , आमदार निधी , जिल्हा ग्रामविकास निधी इ . वापर तसेच इमारतीमध्ये व्यापारी गाळे बांधून ५०% गाळांत विक्री करण्यात येईल . (५०% गाळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देणे आवश्यक) .

- संपर्क - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा ( याच इमारतीत ग्रामपंचायतीस उद्योग तसेच इतर दाखले देण्यासाठीची कार्यालये , महा - ई- सेवा केंद्र व सातबारा उतारा (संगणकीय) पत्र सुविधा देता येतील ).

 

२. लोकशाही दिन

- सर्व विभागांच्या वरिष्ठांकडे तक्रारी देता याव्यात यासाठी .

- जिल्हाधिकारी कार्यालय - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी

तहसीलदार कार्यालय - दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी .

३. आमदार व खासदार स्थानिक विकास निधी .

- आमदार निधी - दरवर्षी २ कोटी .

खासदार निधी - दरवर्षी ५ कोटी .

-ग्रामसचीवालय , स्वच्छता , पाणी योजना , रस्ते इ . शक्य .

- आमदार / खासदाराच्या लेटरहेड वर पत्र , अंदाजित खर्चासहित जिल्हा नियोजन अधिकार्यास सादर करावे .

- मागासक्षेत्र अनुदान निधी

- गडचिरोली , भंडारा ,चंद्रपूर , गोंदिया , धुळे , नांदेड , नंदुरबार , अहमदाबाद , अमरावती , यवतमाळ व औरंगाबाद जिल्ह्यासाठी .

- पाच वर्षांचा कृषी आराखडा .

- कृषी , पशुसंवर्धन , पाटबंधारे , आरोग्य , शाळा , समाजमंदिर इ . योजना

- संपर्क - प्रकल्प संचालक , जिल्हा ग्रामीण विकास .

४) ग्रामपंचायतींना ४० लाखाचा निधी .

५) तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम

- धार्मिक स्थळी भाविकांना आवश्यक सोयी . सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी

- पिण्याच्या पाण्याच्या सुविधा , स्वच्छतागृहे , धर्मशाळा ,रस्ते , पथदिवे इ .

- तीर्थक्षेत्राचे ट्रस्ट , धार्मिक संस्था यांचे बंधपत्र .

- संपर्क - मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद .

 

६) ग्रामपंचायतीत क्रीडा सुविधा

- ग्रामीण स्तरावर क्रीडा सुविधां उपलब्ध करण्यात .

- विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर १ लक्ष व गट स्तरावर पाच लक्ष अनुदान .

- व्यवस्थापन खर्चासाठी ग्रामपंचायत - १० हजार व गट स्तरावर २४ हजार  अनुदान .

-  अर्ज - ?

७) ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी अनुदान

पाच हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना

- बाजारपेठ , अभ्यास केंद्र , दिवाबत्ती इ .

- दरवर्षी २५ लक्ष , पाच वर्षात जास्तीत जास्त १ कोटी

- ग्रामविकासाचा आराखडा .

- संपर्क - मुख्य कार्यकारी अधिकारी , जि. प.

बाजारपेठ - २५ लक्ष , दिवाबत्ती - १० लक्ष , बगीचा / उद्यान - १५ लक्ष , अभ्यासकेंद्र - ७ लक्ष , स्मशानभूमी - १० लक्ष .

 

८) राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोत्ती

- बचत गटांचे संघटिकरण करून त्यांना उत्पादन क्षमता , विपणन व्यवस्था मिळवून देणे .

- ठाणे , रत्नागिरी , सोलापूर , नंदुरबार , जालना , उस्मानाबाद ,यवतमाळ , वर्धा , गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातील ३६ तालुक्यांवर लक्ष केंद्रित .

- बचत गटांना रु. १०-१५,०००/- फिरता निधी , भांडवली अनुदान १५ हजार ( अ. जा - २०,०००)

- स्वयंसहाय्यता गटास - रु . २ . ५ लक्ष अनुदान .

- किमान ७० % सदस्य दारिद्र्य रेषेखालील .

- बचत गटांचे व्यवस्थापन , आर्थिक नियमन , पुनरुज्जीविकरण करण्यात येणार आहे .

- संपर्क - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा .

रोजगार योजना

उत्पादक स्वरूपाची विकासकामे करणे . जलसंधारण विहीर ( जवाहर विहीर ) पाडे , रस्ते , फळबागा अशा कामांसाठी

- प्रत्येक कुटुंबात किमान १०० दिवस रोजगार दिवसाला रु. १६५ मजुरी

- अपघात विमा , बाळंतपण रजा इ . सोयी

- संपर्क - १. जलसंधारण रस्ते - तलाठी व ग्राम सेवक

२. जवाहर विहीर - ग्रामसेवक , गटविकास

३. फळबाग - कृषी सहाय्यक / तालुका कृषी अधिकारी

४. वृक्ष लागवड -  सामाजिक वनीकरण

५. रेशीम उत्पादन - सहसंचालक रेशीम उद्योग .

 

२. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना .

- अकुशल काम करण्यास असूक

- मजुरी रु. १६५/- प्रतिदिन - पाच कि. मी परिधान काम देणे आवश्यक .

- गावातील कामे ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेस आहे .कामाचे नियोजन , प्राधान्यक्रम , अंमलबजावणी ग्रामसभा करेल . 

- जॉबकार्ड घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल .

- कुक्कुटपालन , शेली पालनासाठी शेण , गांडूळ खतनिर्मिती , मासे निर्मिती , पाणीपुरवठा इ. कार्ये .

- नगरपालिकेची योजना राबवते .

३) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

- संपूर्ण ग्रामीण भागातील बेरोजगारांना किमान १०० दिवस रोजगार ,

- टिकाऊ मालमत्ता तयार करणे , नैसर्गिक संपत्तीचे , बिकाऊ

- प्रतिमाणशी ५ किलो धान्य वाटप

- ५०% अनुदान ग्रामपंचायतींना

- संपर्क - जिल्हा ग्रामीण

पायाभूत योजना

१. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना

- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अल्पदरात वीज कनेक्शन

- १५ रुपयांत वीजजोड

- नाव दारिद्र्य रेषेखाली असावे , घरात वीज बसावी ,घर स्वतःच्या मालकीचे असावे .

- संपर्क - स्थानिक महावितरण कार्यालय / ग्रामसेवक .

 

२. भारत निर्माण योजना -

ग्रामीण निवारा , बारमाही ग्रामीण रस्ते , ग्रामीण रस्ते , ग्रामीण भागाचे विद्युतीकरण , दूरध्वनी सेवा , ग्रामीण शुद्ध पेयजल व सिंचन या सुविधा 'भारत निर्माण ' अंतर्गत पुरवण्यात येणार आहे .

 

३. ग्रामीण भागात सौर दिवे .

- ग्रामीण रस्त्यांवर सौरदिवे .

- केंद्र शासनाकडून रु. ९६००/- अनुदान .

- आदिवासी भागात जादा दिव्यांसाठी जादा व्यवस्था .

संपर्क - उप मुख्य कार्यकारी अधिकारी (जि . प )

  ४. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

- १०००, ५०० - ९९९, २५० - ४९९ लोकसंख्येतील गावांमध्ये बारमाही रस्ते पुरवणे व त्यांचा दर्जा वाढवणे .

- ऑनलाईन संपर्क - Pmgsy.nic.in

 

५. एकात्मिक ग्रामीण उर्जा कार्यक्रम

- मेडा मार्फत सौरऊर्जेमधील उपकरणांसाठी

- आमदार फंडातून निधी उपलब्ध

- सौरपंप, सौरबल्ब , सोलार कुकर , बायोगास साठी अनुदान

- संपर्क - पंचायत समिती , जिल्हा परिषद .

 

६. राष्ट्रीय बायोगास विकास

- कमी खर्चात इंधन , शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत

- बायोगास प्रकल्प उभारणी -

 १ घन.  मी . संयंत्र - ४ हजार शौचालय जोडल्यास रु. १०००/-

२ - ४ घ. मी. संयोगास - ८ हजार

इंजिन जनरेटर - ५ हजार

- संयोगाच्या क्षमतेनुसार जनावरांची संख्या असावी .

- संपर्क - गट विकास अधिकारी , पंचायत समिती .  

 

सामाजिक सुविधा विषयक योजना

१. संजय गांधी निराधार अनुदान योजना .

- निराधार असल्याने उदरनिर्वाह करू न शकणार्या जेष्ठ नागरिकांसाठी व १८ वर्षांखालील अनाथ मुलांसाठी, ६५ वर्षांखालील पुरुष व महिला अपंग , क्षयरोग पसाधान, प्र्माकीत घात कुष्ठरोग , सर्वरोग एड्स ग्रस्त , निराधार महिला , आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधक ज्यांचे उत्पन्न वार्षिक २१  हजाराच्या खाली आहे . घटस्फोटीत पण पोटगी न मिळालेल्या अत्याचार्यात व वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला , तृतीय पंथीय व देवदासी .

- वार्षिक उत्पन्न २१ हजारपेक्षा कमी हवे .

- एका व्यक्तीच्या ६००/- प्र. महिना . एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबांना ९००/- प्र. महिना.   

- संपर्क - तहसीलदार .

२. श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती

-६५ व ६५ वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असणार्या निराक्षर स्त्री - पुरुषांना ४००/- प्र. महिना + इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना - २००/- प्र . महिना .

- नाव ग्रामीण / शहरी दारिद्र्य रेषेखालील यादीत असले पाहिजे .

- संपर्क - तहसीलदार .

 

३. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन .

- ४० - ६५ वर्षा वर्षापर्यंतच्या विधवा निवृत्ती वेतन पात्र .

- ६००/- प्र. महिना

- संपर्क - तहसीलदार / नायब तहसीलदार .

 

४.  इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग  निवृत्तीवेतन .

- १८ ते  ६५ वयोगटातील ८०% अधिक अपंगत्व असलेले . 

- ६००/- प्र. महिना

 

५. इंद्दीरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळात निवृत्तीवेतन .

- दारिद्र्य रेषेखालील समाविष्ट ६५ वर्षांवरील लाभार्थ्यांना .

- संजय गांधी योजनेतील विद्यार्थ्यांना ६५ वर्षांचे झाल्यावर या योजनेतील विद्यार्थ्यांना ६५ वर्षांचे झाल्यावर या योजनेत सामावून घेतले जाइल .

- ६००/- निवृत्त्तीवेतन

संपर्क - तहसीलदार कार्यालय

६. कुटुंब अर्थसहाय्य योजना

- कुटुंबाच्या एकूण उत्पनात मोठा वाटा असलेल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू

- मृत व्यक्तीचे वय १८ ते ५९ वर्ष दरम्यान असावे .

- दारिद्र्य रेषेखालील असावे .

- अपघाती मृत्यू झाल्यास रु. २०,०००/-

- अर्ज –

 

७) प्रसूती कालीन अर्थसहाय्याची राष्ट्रीय योजना

- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १९ वर्षे व अधिक वय असणाऱ्या गरोदर स्त्रीस लाभ .

- पहिल्या दोन मुलांपर्यंतच

- प्रत्येक प्रसूतीसाठी रु. ३००/- सहाय्य .

- संपर्क तलाठी / महिला व बालकल्याण विभाग, पंचायत समिती , नगर परिषद , महानगरपालिका .

८) जनश्री विमा योजना

- असंघटीत कामगारांसाठी

- १८ ते ६० वर्षे वयोगटातील

- प्रिमियम रु. २००/- लाभार्थी रु. ५०/- शासन रु. १५०/-

- नैसर्गिक मृत्यू - रु. ३०,०००/- , अपघाती मृत्यू रु. ७,५००.

कायमस्वरूपी अपंगत्व रु. ७५,०००/-  इ .

- संपर्क - कामगार कल्याण अधिकारी 

९) आम आवृत्ती विमा

- शेतमजुरांसाठी

- १८ ते ५९ वयोगटातील शेतमजुरांना लागू

- नावाची नोंद तलाठी कडे करावी

- मृत्यू १,०५,०००/- अपंगत्व . ७५,०००/- अर्धअपंगत्व - ३०,५००/-

- प्रीमियमची गरज नाही ( शासन भरेल )

- संपर्क - तहसीलदार कार्यालय

 

१०) सार्वभौमिक स्वास्थ्य विमा योजना

- ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी

- नेशनल इन्शुरन्स मार्फत योजना राबवली जाते .

- वैयक्तिक वार्षिक प्रिमियम रु. १६५/-

५ माणसांच्या परिवारासाठी रु. २४८/-

७ माणसांच्या परिवारासाठी रु. ३३०/-

- चिकित्साखर्च रु. ३०,०००/ -

दुर्धना लाभ - रु. २५,०००/-

कमावत्या व्यक्तीस इस्पितळात जावे लागल्यास - रु.

रु. ५०/- प्रतिदिन १५ दिवसांपर्यंत

संपर्क - नेशनल इन्श्युरन्स कार्यालय .

११) राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

- असंघटीत क्षेत्र कामगारांसाठी

- वैद्यकीय सुविधा मिळावी / यासाठी

- नेशनल इन्श्युरन्स कंपनीमार्फत अंमल बजावणी

- विमा हप्ता - ६६३/- प्रती कुटुंब

- लाभार्थ्यास स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाईल .

संपर्क - नेशनल इन्श्युरन्स कार्यालय .

 

१२) हृदय शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत -

१. १ली - ४थी  विद्यार्थ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया

अर्ज - जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद .

२. हृदयरोग , कॅन्सर वा किडनी रुग्णास जिल्हा परिषद स्वीय निधीतून ,शस्त्रक्रियेची किमान रु. १३,०००/- पर्यंत आर्थिक मदत , - जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावाने अर्ज .

- रुग्णालयाची पैसे भरल्याची पावती .

 

३) मुख्यमंत्री सहाय्य्ता निधी

- अर्ज - मुख्यमंत्री सहाय्यता निधी , महाराष्ट्र शासन , मुंबई ५२.

- सोबत आमदाराचे शिफारसफ्त्र जोडावे .

 

४) पंतप्रधान निधीतून मदत

- शस्त्रक्रियेआधी अर्ज जाणे आवश्यक .

- वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत अर्ज पंतप्रधान साहाय्य निधी , विशेष अधिकारी , पंतप्रधान कार्यालय , नवी दिल्ली - ११.

- खासदाराचे शिफारस पत्र जोडावे .

 

१३) दुर्बल गाफील रुग्णावर उपचार -

- शासनाने ज्या रुग्णालयांसाठी जमीन दिलेल्या रुग्णालयांत मोफत / सवलतीच्या दरांत उपचारांसाठी योजना

- उत्पन्ना मर्यादा रु. १ लक्ष वार्षिक

- रुग्णालयांमध्ये समाजसेवकाकडे अर्ज करावा ,

- यादी धर्मादाय आयुक्त कार्यालयात .

 

१४) शहरी गरीब रुग्ण योजना

- महानगरपालीकेच्या निधीतून

- उत्पन्न मर्यादा रु. १ लक्ष प्रती . वर्ष .

- संपर्क - महानगरपालिकेचे आरोग्यखाते .

 

१५) राजीव गांधी जीवनदायी योजना .

- आर्थिक दुर्बल घटकांसाठी

- उत्पन्न मर्यादा रु. १ लक्ष प्र वर्ष (केशरी)

रु. १. ५० लक्ष पर्यंत वैद्यकीय सेवा प्र . व .

- लाभार्थ्यांना ' हेल्थ ' कार्ड दिले जाइल .

नेशनल इन्शुरन्स कंपनीच्या निवडक रुग्णालयात उपचार

- संपर्क - आरोग्य मित्र ( शासकीय रुग्णालये )

 

शैक्षणिक

१. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

- मुली गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी

- ८ वी - १० वी अनुसुचित जाती मुलीना १००/- प्र. म

 

२. राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती .

९वी १० वी - २५०/- प्र. म - शासकीय शाळेत

- ११ ,१२ - ३००/- प्र. म - ६०७ अधिक

- पदवी - ५००/- प्र. म .

- पदव्युत्तर शिक्षक - ७५०/-

कौटुंबिक उत्पन्न - १ लक्ष पर्यंत प्र. व

गुणवत्ता यादीतील विद्यार्थी .

३. आर्थिक भागात विद्यार्थ्यांसाठी शाळांत परीक्षेसाठी शिष्यवृत्ती

- आर्थिक उत्पन्न - रु . ३०००/- प्र. व

- शासकीय ९६ विद्यार्थी .

- १० वीत ५०% गुण.

 

४. १ ली ते ४थी

अ ) अनुसूचित जाती / जमाती विशेष सवलत .

- विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

-ग्राम शिक्षण समिती

- दारिद्र्य रेषेखालील दाखला

ब ) लेखन साहित्य

- दारिद्र्य रेषेखालील

- गटशिक्षण अधिकारी  - पंचायत समिती

क ) विद्यारर्थींनी

- अनुसूचित जाती / जमाती , विमुक्त जाती दारिद्र्य रेषेखालील मुलींना प्रतिदिन १/-

- मुख्याध्यापक .

५) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती महामंडळ

- उच्च शिक्षण / तंत्रशिक्षण घेण्यासाठी .

- ७५०००/- - ३ लक्ष - @ ४. ५ %

- प्रशिक्षणानंतर ६ महिन्यांनी - ५ वर्षांच्या मासिक हपत्यात

- वय १८ - ४५

- वार्षिक  उत्पन्न ३९ , ३०/- शहरी - ५४, ४९ /-

६) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ

- मुस्लिम , ख्रिस्चन , शीख , बौद्ध , पारसी

- आर्थिक दृष्ट्या दुर्बल - वार्षिक उत्पन्न ५८,५००

- शहरी व रु. ३९,५००/- ग्रामीण .

- १६ - ३२ वर्षे .

- २,५०,०००/- पर्यंत व ३ %

- शिक्ष्य संपल्यावर ६ महिन्यांनी ३ वर्षात

परतफेड .

 

७) अण्णासाहेब पपिल इतर मागार्स्वर्गीय वित्त व विकास महामंडळ .

- व्यावसायिक अभ्यासक्रम

८) परदेशी शिक्षण घेण्यासाठी

- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी

- पदव्युत्तर १३ व संशोधनालक १२.

- वयोमर्यादा - ३५ वर्षे

- उत्पन्न - २,५०,०००/- वार्षिक

९) देशांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यसाठी

- अनुसूचित जातीचा

- २,५०,०००/- वार्षिक उत्पन्न .

- समाजकल्याण विभाग महाराष्ट्र शासन .

 

१०) आयटीआय प्रशिक्षण

- अनुसूचित जाती

- मागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षण अल्पमुदतीचे प्रशिक्षक

- १००/- प्र. म . विद्यावेतन + रु. १,००,००० /-

-प्राचार्य

११) अल्पसंख्यांकासाठी मेट्रीक शिष्यवृत्ती

- मुस्लिम , शीख , ख्रिश्चन, पारसी

- १ली ते १० वी

- वार्षिक उत्पन्न - १,००,०००

 गट शिक्षण अधिकारी - पंचायत समिती

१२) अल्पसंख्यांकासाठी मेट्रीकोत्तर

- ११वी - पीएचडी

- मागील परीक्षेत किमान - ५०%

- उत्पन्न मर्यादा -२ लक्ष

संपर्क - शिक्षण संचलनालय .

 

१३) कमर्शियल पायलट लायसन्स -

- केंद्र शासनातर्फे ५० विद्यार्थ्यांना

- अनुसूचित जाती / नववैरागी - १२ वी विज्ञान .

- उत्पन्न - १ लक्ष प्र. व

- समाजकल्याण संचनालय.

१४) सेन्ट्रल सेक्टर महाविद्यालयीन व विद्यापीठ शिष्यवृत्ती .

- १२ वि ८०% अधिक गुण

- वार्षिक उत्पन्न - रु. ४.५० लक्ष

- divhe. org.in

- संपर्क - शिक्षण संचालक , उच्चाधिकारी

 

१५) अल्पसंख्यांक रोजगारभिमुख प्रशिक्षण

- रोजगारभिमुख प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांन

- ४०००/- प्रमाणे शुल्क जे कमी .

१५) अनुसूचित जाती मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती -

- ९ वी / १० वी शिकत असावेत .

अपंग

म. राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ

१) उद्योगासाठी

२) मनोरुग्ण व आत्मरुग्ण स्वयं रोजगार .

३) शाळांतपूर्व शिष्यवृत्ती अपंग विद्यार्थिनी .

४) मेट्रीकोत्तर -

५) स्वयंसेवी संस्थांना मदत

६) अपंग पुनर्वसन केंद्र

७) कृत्रिम अवयव व साधने .

मागासवर्गीय कल्याण योजना

१) दलित वस्ती सुधार

- पाणीपुरवठा , अंतर्गत रस्ते नाले , विद्युतकरण इ.

- अनुसूचित जातीची लोकसंख्या किमान ५० असणे आवश्यक .

- अनुदान - ५० - १०० - ४ लाख ; १०१ - १५० - ६ लाख , १५१ पुढे १० लाख

 

२) कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना

- अ. जा व नवबौद्ध भुमिदिन शेतमजूर कुटुंबांना पिकाऊ जमीन देणे .

- ४ एकर कोरडवाहू जमीन किंवा २ एकर ओलिताखाली जमीन

- ५०% अनुदान - ५०% बिनव्याजी कर्ज स्वरूपात .

- संपर्क - समाजकल्याण अधिकारी .

 

तांडा वस्ती सुधार

- दलीत वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी .

- अनुदान

- तांडा वस्तीने ठराव करून ग्रामपंचायतीस सादर करावा .

ग्रामसेवक - पंचायत समितीस सादर करावा . ( ग्रा. का. नंतर )

४) पॉवर हिटर चा पुरवठा

- अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थींना

- वार्षिक उत्पन्न रु. ४०,०००/- अधिक नसावे .

- १०० % अनुदान

- संपर्क - विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी

 

५) जिल्हा परिषदेच्या राखीव निधीतून योजना

१) मागासवर्गीय शेतकऱ्यांना ओईल इंजिन / इलेक्ट्रिक मोटर खरेदीसाठी अनुदान रु. १०,०००/-

२) घर दुरुस्तीसाठी - रु. ७०००/- अनुदान .

३) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती - रु. ५०/- दरमहा - १० महिने

४) महिलांना स्वयंरोजगारासाठी लोखंडी स्टोल

५) पुरुषांना फिरत्या विक्री व्यवसायासाठी चारचाकी हातगाडी .

६) मागासवर्गीयांना उद्योगधंद्यासाठी रु. ३,०००/-

७) मोफत सायकल -

८) समाजमंदिर दुरुस्ती - रु. १५,०००/-

९) पाणी पुरवठा , विहिरी यासाठी अनुदान - रु. १,००,०००/-

संपर्क - गटविकास अधिकारी

६) आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन .

- एक सवर्ण हिंदू व दुसरा जोडीदार अनुसूचित जाती / जमाती / वि. जाती भटक्या जमाती .

- जोडपे लाभास पात्र ठरेल .

- रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य

- संपर्क - समाजकल्याण अधिकारी , जि. प.

 

७) घरावरील गवती छप्पर बदलून लोखंडी कौले / पगे घालवण्यासाठी

- रु. ४०००/- अनुदान

- संपर्क - गट विकास अधिकारी .समाजल्याण अधिकारी .

 

महिला व बाल विकासासाठी योजना

१) ५-१० वी च्या विद्यार्थींना

२) महिलांना शिवणयंत्रे .

३) महिलांसाठी सुलभ शौचालये ( जिल्हा परिषदे मार्फत जागा ग्रामपंचायतिने उपलब्ध करून द्यावी .

४) विवाहासाठी अनुदान रु. २०००/-

५) उद्योग धंद्याच्या प्रशिक्षणासाठी अनुदान .

६) गरीब होतकरू मुलांना अर्थसहाय्य रु. २०००/-

७) निराश्रित महिलांना घर बांधण्यासाठी रु. ६०००/-

 

२) कन्यादान योजना .

- दोघांपैकी एक जण अनुसूचित जाती /जमाती , नवबौद्ध , विमुक्त - भटक्या

- हुंडा व बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन नसावे  .

- रु. १०,०००/-

- विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी .

 

३) बालिका समृद्धी

- जन्मांतर रु. ५०००/- अनुदान - सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी / बचत योजनेत जमा .

 

४) आधारगृहे / माहेर योजना .

- १८ - ४० वर्षे पर्यंत निराधार निराश्रीत कुमारी  माता, परित्यक्त्या वा अत्याचारास बळी पडलेल्या - आश्रय गृहांमधील महिलांना प्रति महा २५०/- पहिल्या मुलास १५०/- दुसर्या मुलास १००/- अनुदान .

५) महिला प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी महिला अनुदान

नोंदणी कृत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालणार्या  प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी २८,५००/- अनावर्ती , तसेच ६ महिन्यांच्या एका प्रशिक्षणासाठी कार्यक्रमास २१,५००/- ९ (वार्षिक ४३,०००/- अनुदान )

६) बचत गटांना कर्ज

- महिला आर्थिक विकास मंडळ , ग्रामविकास विभाग व नाबार्डमार्फत स्थापन करण्यात आलेल्या बचतगटांना स्वतःच्या व्यवसाय करण्यासाठी

- ४% व्याज .

- कर्ज मर्यादा - पहिले कर्ज - ५०,०००/-

पहिले कर्ज भरून दुसरे कर्ज - १,००,०००/- 

दुसरे, तिसरे  कर्ज - २,००,०००/-

- उर्वरित व्याज ( ७ % पर्यंत ) शसन भरेल .

७) महिला बचत गटांना मोबाईल व्हेन

- २. ५० लाख माल

- संपर्क - महिला व बालविकास कार्यालय . 

 

 

 

bottom of page