top of page

कृषी साठी शासनाच्या योजना

१) रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम

पात्रता - शेतकरी , विश्वस्त कायद्याखालील संस्था ,

शेतकरी - ७/१२ चा उतारा

१. कोकण - किमान ०.१० हे. जास्तीत जास्त १० हेक्टर पश्चिम घाट , चंद्रपूर , गडचिरोली , पुणे , सातारा , अहमदनगर -

२. किमान - ०.१० हे. मर्यादा ४ हेक्टर.

३. इतर -०.२० हे. कमाल ४ हेक्टर. सेवाभावी संस्था (विश्वस्त संस्था)- कमाल ४ हेक्टर. कोकण १० हेक्टर. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांकडून काम करून घेणे व त्यासंबंधी प्रमाणपत्र द्यावे. सामग्री स्वरूपातील अनुदान परवानाद्वारे पुरविले जाते.

संपर्क :- १) महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ , महाराष्ट्र राज्य

२) सहकारी पणन महामंडळ व विदर्भ को. ऑप. सोसायटी.

 अनुदान - मजुरीसाठी -१००%

सामग्री - अल्प व अत्यल्प भूधारक - १००%

इतर अनुसूचित जाती - १००% व इतर ७५%

तीन वर्षात :- १रे year -५०%

                   २ रे year -३०%

                   ३ रे year -२०%   

दुसऱ्या वर्षी  ७५% व तिसऱ्या वर्षी ९०% झाडे जिवंत असणे आवश्यक 

२. राष्ट्रीय गळीत धान्य आणि तेलबिया 

अनुदान: सर्वसामान्य शेतकरी : ४०%

             महिला आणि अल्प भू धारक: ५०%

संपर्क: तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक 

३) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान  

अट : बँक कर्जांशी निगडीत असावे .

       १.   लागवड साहित्य उत्पादन :- मोठी रोपवाटिका बनविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र १८ लाख (५० %) लहान रोपवाटिका बनविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र ३ लाख (५०% ) खाजगी क्षेत्र मोठी रोपवाटिका ९ लाख , खाजगी क्षेत्र लहान रोपवाटिका १.५ लाख

      २. a) भाजीपाला बिजोत्पादन - सार्वजनिक १००% मर्यादा ५०,००० /- प्रती हेक्टर खाजगी ५०% मर्यादा २५,०००/- प्रती हेक्टर जास्तीत जास्त ५ हेक्टर .

    b) बीजोत्पादनासाठी सोयी सुविधा :- सार्वजनिक - १०० % खाजगी - २५% ( बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या स्वरूपात)

     ३. a) फळबाग लागवड - (रोजगार हमी योजनेशी निगडीत) 

      आंबा, काजू , द्राक्ष , चिकू , मोसंबी , पेरू , लिंबू , संत्रे - ७५ % कमाल २२,५००/- प्रती हेक्टर मर्यादा ४ हेक्टर .

      जिवंत झाडांचे प्रमाण - २ रे year -७५% , ३रे year - ९० %

       b) औषधी व सुगंधी वनस्पती : ७५% कमाल ११२५०/- प्र. हे. - कमाल ४ हेक्टर .

    ४. फळबागांचे पुनरुज्जीवन : ५० % कमाल १५०००/- प्र.हे. - कमाल २ हेक्टर .

    ५. सिंचन सुविधा स्त्रोत : सामूहिक शेततळे निर्माण करून क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी १० हेक्टर - खर्चाच्या १०० % ४. लाख

कृषी माल निर्यात अनुदान 

(समुद्रमार्गे निर्यातीसाठी)

पात्र अर्जदार: शेतकरी, सहकारी संस्था, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, कंपनी, पार्टनशीप फर्म 

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, कझाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, रशिया, मॉरिशसआणि लेटिव्हिया या देशांना केलेल्या निर्यातीसाठी पात्र, 

 

अनुदान रु ३०,०००/-

संपर्क: महाराष्ट्र कृषी पणन मंडळ. पुणे 

bottom of page