top of page

उद्योगी व्हा... 

 

व्यवसाय किंवा व्यापार हे एक विशेष क्षेत्र मानले जाते सर्वांनाच ते जमते असे नाही किंवा त्यात धोका आहे  हे समजून मराठी माणूस व्यवसायापासून नेहमी दूर  राहत आला आहे. अगदी किर्लोस्कर, बेडेकर इथ   विठ्ठल कामत, नितीन पोतदार  हे यशस्वी उद्योगपती होऊनही मराठी  माणसाचे उद्योगाविशायीचे भय गेलेले नाही. वास्तविक माणसाला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता फक्त उद्योगामाध्येच आहे. नोकरीपेक्षा  व्यवसाय अधिक मानसिक शांती देतो, स्वतःसाठी  करण्याचे सुख वेगळे असते.  आज महाराष्ट्राला श्रीमंत व्हायचे असेल तर  उद्योजकतेची कास धरणे आवश्यक आहे. मात्र उद्योगाचा विचार करताना मराठी तरुण फारसा  दिसत नाही. याचे अजून एक कारण सांगितले जाते ते म्हणजे पैसे नसणे. व्यवसाय  सुरु करायचा म्हणजे ऑफिस आणि मनुश्यबळ हवे हि समजूत असते.  एवढा पैसा आणायचा कसा किंवा गुंतवायचा कसा हा  प्रश्न अनेकांना पडतो आणि म्हणून ते उद्योगापासून दूर राहतात. त्यामुळे आज आपण पाहूया असे व्यवसाय  घरच्या घरी किंवा कुठल्याही लहान जागेत  कमीत कमी भांडवलावर सुरु करता येण्यासारखे आहेत. 

घरच्या घरी करता येण्यासारखे व्यवसाय भाग १

१. डबे पुरवणे 

अनेक महिला आणि बचत गट हे व्यवसाय करीत आहेत. डबे पुरवणे हा एक उत्तम जोडव्यवसाय आहे. तुमच्या आजूबाजूच्या ऑफिसमध्ये  मार्केटिंग करता येईल. 

भांडवल : १००००

मनुष्यबळ: सुरुवातीला एकटीने किंवा बचत गटातील  महिलांना काम सुरु करता येईल. डबे पुरवण्यासाठी एखाद्या मुलाला ठेवता येईल. जास्त डबे असतील तर डबेवाल्यांची  मदत येईल. 

स्थिर भांडवल:  शेगडी, भांडी, शेफ चे कपडे, जेवणाची उपकरणे, स्वच्छतेची उपकरणे

खेळते भांडवल: कच्चे अन्न, डबे, इतर साधनसामग्री 

साधारणत: गुंतवणुकीचा परतावा मिळण्याचा कालावधी: १ वर्ष 

 

२. केटरिंग व्यवसाय:

यापुढील स्टेप म्हणजे जेवण पुरवणे. यामध्ये रोजचे जेवण आणि रेस्तारो प्रमाणे जेवण पुरवणे यांचा समावेश होतो. मात्र यासाठी तुमच्याकडे फूड आणि ड्रग्स संचालनालयाचे लायसन्स असणे आवश्यक आहे. 

 

या व्यवसायाला खूप मागणी आहे. लोकांकडे पैसा असल्याने पूर्वीपेक्षा हॉटेलिंग वर अधिक पैसा खर्च होऊ लागला आहे. दुसरीकडे थकाथकीच्या दिवसानंतर घरी येउन जेवण बनवणे नकोसे वाटते. अशा वेळी रोज किंवा काही ठराविक दिवशी तुमच्याकडे जेवणाची ताटे मागवली जाऊ शकतात. त्यातून तुम्ही घरगुती जेवण देत असल्याने ते अधिक रुचकर आणि पौष्टिक असेल. त्यामुळे तुम्च्याकासे येणारी पावले वाढतील. 

 

३. घरगुती सेवा- एकच छताखाली (होम युटीलिटी सर्विसेस) 

प्रत्येक घराला इलेक्त्रिशन, प्लंबर, पेंटर आणि कार्पेंटर यांची  आवश्यकता असतेच. मात्र योग्य  मिळेलच असें नाही. विशेषतः घर बदलून येणार्यांना आणि नवीन घर  घेऊन भागात येणार्यांना अधिक सतावतो. 

 

अशा वेळेस जर तुम्ही यातील कुठलीही एक किंवा सर्व सेवा एकत्र देऊ शकत असाल तर तुमचे फोन दिवसभर खणखणतील. तुम्ही अनेक सेवा देणार्यांना एकत्र करून एक ग्रुप किंवा असोसिएशन बनवू शकता. 

भांडवल: साधारण १०,०००/-

स्थिर: वापरावयाचे सामान, तुमच्या सेवेच्या नावाचा लोगो असणारे विशिष्ट कपडे. 

खेळते भांडवल: मार्केटिंग साठि आणि लहान सहन वस्तू मार्केट मधून आणण्यासाठी एक मुलगा. 

 

४. गिफ्ट वस्तू

भारत हा सणासुदीचा देश. आपण उत्सवप्रिय माणसे. अर्थात आपल्या आप्तजनांना विविध वस्तू गिफ्ट म्हणून देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. देणार्याच्या क्षमतेनुसार १०० रुपयापासून १०००० पर्यंत काहीही वस्तू गिफ्ट म्हणून देत येऊ शकते. त्याचबरोबर उद्योगपती आपले क्लायनट्स, उद्योगातील सहकारी, विक्रेते यांना चांगले संबंध म्हणून गिफ्ट्स देत असतात.  

त्यामुळे गिफ्ट वस्तू पुरवणे यासारखा व्यवसाय भारतात नाही. यात विशिष्ट व्यवसायासाठी भेटवस्तू त्या कंपनीच्या ब्रान्दिंग ने करून देणे हा महत्वाचा भाग आहे. अनेक कंपन्या अशा भेटवस्तू मोठ्या प्रमाणात देत असतात. विशेषतः दिवाळीच्या सुमारास. त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीच्या २५ वर्षे पूर्ण होणे, ५० वर्षे पूर्ण होणे अशा विशिष्ट सामायासही भेटवस्तू दिल्या जाऊ शकतात. 

 

या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे, एक प्रचंड सृजनशीलता- काय नवीन काय वेगळे आपण सुचवू शकतो, मार्केटचा अभ्यास आणि दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात स्टोक देण्यासाठी भरवशाचा विक्रेता पाठीशी असणे. 

गिफ्ट वस्तुंमध्ये चोक्लेत्स पासून ते लहान मोठी इलेक्ट्रोनिक उपकरणे आणि पाठीवरच्या बेगांपासून हातातील नक्षीदार पिशव्या यापर्यंत काहीही असू शकते. 

 

भांडवल : साधारण : २०-२५,०००

खेळते भांडवल: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी. 

 

४. ऑफिस स्टेशनरी

प्रत्येक ऑफिसला स्तेश्नारीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यात बेगांपासून स्टेपलर पिनांपर्यंत आणि नोटपेड पासून ते हाउसकिपिंनग च्या सामानापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात यादी आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई ठाण्यात लहान मोठी अनेक ऑफिसेस आहेत. त्यांना लागणाऱ्या स्तेशनरीचे प्रमाण किती असेल याचा अंदाज लावा. 

 

भांडवल: साधारण: २०-२५०००

स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या, बिझनेस कार्ड, ब्रोशर. 

खेळते: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी. तसेच थोडाफार माल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 

 

५. इंडस्ट्रीला लागणारी उपकरणे 

हा थोडासा विशेष प्रविण्याचा व्यवसाय आहे. प्रत्येक उत्पादकाला मशिनरी,  विविध पार्टस इथपासून नट्स, स्क्रू ड्रायव्हर्स, हेल्मेट्स, हातमोजे अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी लागतात. कंपनी जेवढी मोठी गरज तेवढीच मोठी. 

 

यसाठी विविध उत्पादकांशी तुमचे चांगले संबंध असणे आवश्यक आहे. ऑफिस स्टेशनरी पेक्षा या व्यवसायाची निकड खूप वेगळी असते . लागणारी वस्तू आज किंवा उद्या हवी असू शकते. त्यामुळे वेळेवर वस्तू पुरवणे अत्यंत आवश्यक आहे. 

 

भांडवल: साधारण: २०-२५,०००

स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या/कपडे , बिझनेस कार्ड, ब्रोशर. 

खेळते: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी

 

६. टोटल सर्विसेस 

वर उल्लेखलेल्या होम अप्लायन्सेस पेक्षा हि वेगळी सेवा आहे. अनेक लहानसहान घरगुती किंवा व्यवसायाची कामे करण्यासाठी वेळ नसतो- जसे बेन्केची कामे, पोस्टाची कामे. विशेषतः वृद्ध राहत असतील तर त्यांना याची निकड असतेच. त्यामुळे टोटल सर्विसेस हा एक वेगळा सेवा उद्योग होऊ शकतो. दिलीप प्रभावळकरांचा बोक्या कसा समोरच्या आजी आजोबांची कामे करतो, तशाच सेवा तुम्ही देऊ शकता- फक्त पैसे घेऊन,  आनंदाने द्यायला तयार असतात. अनेक आजी आजोबांना फक्त वेळ घालवण्यासाठी कोणाची गरज असते. अनेक लहान सहन उद्योगांना वरवरची कामे करून देऊ शकेल असा कोणी हवा असतो. या सर्व्ह गोष्टी टोटल सर्विसेस मध्ये येतात. 

भांडवल: भांडवल: साधारण: १०-१५०००

स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या/कपडे,बिझनेस कार्ड, 

खेळते: मार्केटिंग, दिमतीला एक-दोन मुले 

 

७. रिअल इस्टेट सल्लागार 

सध्या रिअल इस्टेट चे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र तरीही त्यांची मागणी कमी होत नाही. भाडेकरूंची संख्या वाढते आहे. तसेच अनेक उद्योगांना गाळे, ऑफिसेस हवी असतात. तुम्हाला तुमच्या परिसराची व्यवस्थित माहिती असेल आणि बोलण्याचे चातुर्य असेल तर रिअल इस्टेट एजंट हे मोट्ठे क्षेत्र तुमची वाट पहात आहे . 

 

तुम्हाला स्वतःला फिरावे लागेल आणि तुमच्या परिसरात कुठे काय विकायला किंवा भाड्याने द्यायला उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. 

 

सुरवातीला केवळ तुम्ही, तुमचा बोलघेवडेपणा आणि बिझनेस कार्ड या भांडवलावर हा व्यवसाय तुम्ही सुरू करा. लोकांकडे तुमचा नंबर असेल आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही हजर राहू शकत असाल तर तुम्हाला ऑफिस ची काहीच गरज नाही. 

 

भांडवल- ५ ते १०,०००

 

८. क्लास

तुम्हाला शिकवायला आवडते का? तर क्लास हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमचा विद्यार्थी गट निवडावा लागेल.  म्हणजे दहावी पर्यंत, कोलेज- आर्ट्स कॉमर्स सायन्स, त्यापुढे मग आयटी, मास मिडिया, इञ्जिनिअरिङ्ग वगैरे. त्याचप्रमाणे तुम्ही कोम्प्युतर, वेब डिझायनिंग, इलेक्त्रीषण, प्लंबर, फर्निचर असे विशिष्ट क्लासेसहि घेऊ शकाल. 

 

परकीय भाषा क्लास 

तुम्हाला एखादी परकीय भाषा येत असेल(असतील) तर दुधात साखर. सध्या परकीय भाषांची मागणी विशेषतः जापनीस, चायनीज, जर्मन आणि फ्रेंच वाढत जाणार आहे. त्याचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता. यात प्रचंड पैसा आहे. 

 

तुमच्या क्लास ची उत्तम जाहिरात तुमचे विद्यार्थीच करतात. 

 

सध्या तुमच्या राहत्या घरी तुम्ही क्लास सुरु करा. किंवा एखाद्या क्लास शी टाय अप करून त्याला ठराविक हिस्सा देण्याच्या बोलीवर सुरु करा. 

भांडवल: १०-१५००० ते  ४०-५००००

स्थिर: फळा, मार्कर, लेप्टोप, प्रोजेक्टर 

खेळते:  मटेरिअल

 

९. सोफ्ट स्किल 

बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षासुद्धा अधिक काही वेगळे हवे असते . ते म्हणजे तुमच्यातील विविध किंवा विशिष्ट गुणांचा विकास. यात आंतर मानवी संबंध आले किंवा एखादा विशेष गुण आला. वेळेचे व्यवस्थापन, ऑफिस व्यवस्थापन, सेक्रेटरी सर्विसेस, उद्योगातील आंतर मानवी संबंध व्यवस्थापन, सेलिंग स्किल्स, मार्केटिंग स्किल्स, संवाद (कम्युनिकेशन) अशा अनेकविध गोष्टींचे प्रशिक्षण तुम्ही देऊ शकता. 

 

तुम्ही सध्या उद्योग किंवा नोकरी मध्ये एका चांगल्या हुद्द्यावर असाल किंवा मार्केटिंग, मनुष्यबळ अशा विशेष क्षेत्रात असाल तर तुम्ही हे प्रशिक्षण देऊ शकता. पूर्णवेळ  किंवा शनिवार रविवार अशा स्वरुपात हे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. पूर्णवेळ करणार असाल तर अनेक कंपन्या दोन तीन दिवसांचे कोर्सेस घेण्यासाठी तुम्हाला बोलावू शकतात. 

 

भांडवल: साधारण ४० ते ५०,००० 

स्थिर वेबसाईट, चांगले कपडे, बिझनेस कार्ड आणि लेप्टोप.

खेळते: स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी विविध सेमिनार्स, मेग्झींस, पेपर यांचे वाचन, पुस्तके यावरील खर्च, मटेरिअल

 

१०. सल्लागार-

तुम्हाला विशिष्ट क्षेत्राचे ज्ञान आणि अनुभव असेल तर तुम्ही उद्योगांना खालील क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करू शकता-

१. व्यवस्थापन सल्लागार

यासाठी तुमचा विशेष क्षेत्रांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तुम्हाला व्यवस्थापनातील खाचाखोचा आणि बारकावे, मार्केट, ग्राहक यांचे अद्ययावत ज्ञान असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या क्लायंट च्या गरजा समजून घेऊन त्यांना सल्ला देत आला पाहिजे.

 

भांडवल: ४०-५०००० ते ३-५ लक्ष 

स्थिर: उत्तम कपडे, लेप्तोप, बिझनेस कार्ड, गाडी 

तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे तेवध्ये तुम्ही या क्षेत्रात नावारूपाला लवकर याल.  

 

२. मनुष्यबळ सल्लागार 

तुम्हाला जर मानुस्याबळ क्षेत्रातील अनुभव असेल तर हे एक फार विस्तीर्ण क्षेत्र आहे. मनुष्यबळाचे व्यवस्थापन, मनुष्यबळाचा विकास म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणे आणि विविध मनुष्यबळ पुरवणे म्हणजे एचआर सर्विशेस अशा तीन गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही एका वेळी एकच गोष्ट निवडणे योग्य आहे. 

 

भांडवल: ४०-५००००

स्थिर: लेप्तोप, बिझनेस कार्ड, प्रोजेक्टर

खेळते: विविध कंपन्याशी ओळखी वाढवण्यासाठी सेमिनार्स, विविध चेम्बर्स मध्ये नोंदणी, मटेरिअल, गाडी (असल्यास उत्तम)

 

३. मार्केटिंग सल्लागार

कुठलाही व्यवसाय मार्केटिंग शिवाय चालू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर ,मार्केटिंग तज्ज्ञ असाल तर नोकरी सोडून या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम सुरु करा. मार्केटिंग सल्लागार एखाद्या उत्पन्नाच्या ब्रान्दिंग पासून ते त्याच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे सल्ले देत असतो. या मध्ये जाहिरात कशी कुठे करावी , किती खर्च करावा, ग्राहकाची नस कशी ओळखावी, काय उत्पादन करावे ते कसे कुठे,विकावे  लोगोचा रंग काय असावा, लोगो कसा असावा, तुमच्या उत्पादनाची एक लाइन काय असावी ह्या सर्व गोष्टींचा सल्ला मार्केटिंग सल्लागार देत असतो. 

 

भांडवल: ४०-५०००० ते ३-५ लक्ष 

स्थिर: उत्तम कपडे, लेप्तोप, बिझनेस कार्ड, गाडी 

तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे तेवध्ये तुम्ही या क्षेत्रात नावारूपाला लवकर याल.  

 

४. आर्थिक सल्लागार

एलआयसी एजंट किंवा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या एजंट पेक्षा हे वेगळे क्षेत्र आहे. यात क्लायंट ची आर्थिक कमाई, क्षेत्र, खर्च या सर्वांचा गोषवारा घेऊन दर महिना किती गुंतवणूक करावी, गुंतवणुकीचे , विशिष्ट ओकेजन साठी पैसे साठवणे अशा सर्व गोष्टींचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतो. तो कुठल्याही विशिष्ट कंपनीशी बांधील नसतो. 

 

गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी फायनान्शिअल प्लानिंग बोर्ड ऑफ इंडिया या सास्न्ठेचा गुतंवणूक सल्लागाराचा कोर्स करणे सयुक्तिक आहे. त्यामुळे तुम्हाला पदवी आणि मान्यता मिळते.  

 

तसेच विविध कर्जे मिळवून देणे, आर्थिक व्यवसाय सांभाळणे हि सुद्धा कामे आर्थिक सल्लागार करू शकतो. 

 

 

भांडवल: १-३ लक्ष

स्थिर: उत्तम कपडे, लेप्तोप, बिझनेस कार्ड, (सुसज्ज ऑफिस)

खेळते भांडवल: ऑफिस, किमान एक मुलगा. 

 

५. पब्लिक रिलेशन/ संवाद सल्लागार 

पब्लिक रिलेशन म्हणजे एखाद्या संस्थेची मते, बातम्या आणि संवाद लोकांपर्यंत पोहोचवणे. तुम्ही जर्नलिझम किंवा पब्लिक रिलेशन मध्ये असाल तर तुम्हाला या क्षेत्रात स्वतःचा  निर्माण  येईल. यासाठी तुमच्याकडे कल्पकता,  सृजनशीलता आणि ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे त्याला  संवादाच्या, माध्यमाचा सल्ला देता आला पाहिजे. 

तुमचे  पत्रकार, पत्रकार संघ यांच्याशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे. 

भांडवल: १-३ लक्ष

स्थिर: उत्तम कपडे, लेप्तोप, बिझनेस कार्ड,

खेळते भांडवल: किमान एक मुलगा. 

यापेक्षा सुद्धा अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी काही आपण आता पाहिले.  उर्वरित भाग पुढील लेखात पाहू. 

महत्वाचे म्हणजे हे सर्व उद्योग सेवा उद्योग असल्याने तुम्ही आणि तुमचे ज्ञान/ कौशल्य हे त्याला लागणारे  सर्वात मोठे भांडवल आहे.  

त्यामुळे तुमच्यामधील कौशल्याचा उपयोग करा आणि स्वतःच स्वतःचे बॉस व्हा!

कोणत्या गोष्टी तुमच्या दिमतीला असणे आवश्यक आहे?

 

१. संगणक प्रिंटर 

एक उत्तम संगणक किंवा लेप्टोप, इंटरनेट आणि उत्तम प्रिंटर स्केनर आणि त्यातूनही झेरोक्स कोपिअर असेल तर अधिक उत्तम. 

संगणक आधुनिक ओपेरेतिंग सिस्टीम, पीडीएफ रीडर, जावा माय्क्रोसोफ्त ऑफिस असे विविध सोफ़्त्वेअर असणारा असावा. 

प्रिंटर कलर किंवा ब्लेक आणि व्हाईट आणि कमीत कमी शी खाईल असा असावा. 

 

लेप्तोप असेल तर कुठेही घेऊन फिरू शकतो. त्यामुळे डोंगल वाले इंतार्नेत कनेक्शन अधिक उत्तम. 

घरी वायफाय सिस्टीम करता आली तर उत्तम. त्यामुळे सर्व संगणक एकाच वेळेस इंतार्नेत वर चालू शकतात. 

 

२. ऑफिस युटीलिटी सॉफ्टवेअर 

अशी अनेक सॉफ्टवेअर बाजारात मिळतात जी घरच्याघरी उद्योग करणार्यांसाठी आणि  लहान उद्योगांसाठी उपयुक्त आहेत. 

त्यामध्ये तुम्ही स्वतःचे प्रेझेन्टेशन ब्रोशर केट्लोग बनवू शकता, क्लायंट न देण्याची बिल्स किंवा इन्व्होइस बनवू शकता. कोणाकडून काय विकत घ्यायचे आहे, कुठल्या क्लायंटची कास्तामारची गरज काय आहे, त्याला काय द्यायचे आहे हे सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला मिळते. तसेच कुठल्या कास्त्मार्शी तुमचा काय व्यवसाय झाला, कोणाकडून काय यायचे आहे, द्यायचे आहे, कस्टमर ची व्यावासायासाहित यादी असे सर्व त्या सोफ़्त्वेअर मध्ये असते. 

 

उदा. झोहो. कॉम 

 

३. अकाउंट्स  

तुम्हाला तुमच्या व्यवसायाची उत्तम अकौन्त्स ठेवता आली पाहिजेत. कोणाला आहेत, किती यःचे आहेत. किती व्यवसाय झाला, मागील वर्षाशी  गोष्टी एका झटक्यात तुम्हला समजल्या पाहिजेत. अनेक अकोउन्तिङ्ग सोफ़्त्वेअर बाजारात हेत . त्यापैकी एक टेली. मात्र इतरही लहानसहान सोफ़्त्वेअर आहेत. अनेक अकोउन्तिङ्ग व्यावसायिक सुद्धा हि सुविधा पुरवतात. 

 

४. हार्डडिस्क डेटा 

तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या माहितीचा बेक अप घेत राहिले पाहिजे. सध्याच्या घडीला माहिती सर्वाधिक महत्वाची आहे. ती तुम्ही तुमच्याकडे नित सांभाळून ठेवली पाहिजे. 

 

५. कायदेशीर बाबी

विशिष्ट व्यवसायासाठी काही विशिष्ट लायसन्स आवश्यक असतात. जसे फूड लायसन्स ते तुम्हाला एफडिए डिपार्टमेंट मध्ये मिळेल. 

वैयक्तिक व्यवसायासाठी (सोल प्रोप्रायटर) तुमचे पेन कार्ड असेल. मात्र भागीदारी किंवा कंपनी बनवत असाल तर त्याची वेगळी नोंदणी करणे आवश्यक असते. तुम्ही एक उत्तम सिए किंवा सिएस शी सल्ला घेऊन माहिती घेऊ शकता. 

तुम्ही सेवा पृवत असाल, आणि तुमचे एकूण उत्पन्न ९ लाखापर्यंत पोचले, कि तुम्हाला सेवा करात नोंदणी करावी लागते. तसेच उत्पादनाच्या निर्मितीसाठी राज्य विक्रीकर कायदा आणि  उतप्दन कायद्यांतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र अनेक व्यवसाय त्यातून वगळण्यात आले आहेत. तुम्ही सीए शी सल्लामसलत करावी. 

 

उद्योगासाठी वित्त उभारणी
 
मराठी माणसाला उद्योगाबाब्तीत एक न्यूनगंड नेहमी सतावत असतो, मी उद्योग
करू शकतो पण भांडवल  करणार?वास्तविकता हि  उद्योग उभारण्यासाठी मनाची आणि
आपली तयारी अधिक असावी लागते. भांडवल आणि इतर संसाधनाची जुळवाजुळव
करण्यास अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हा न्यूनगंड  म्हणून आजचा लेख.

उद्योगासाठी वित्त उभारताना तुम्हाला किती पैशाची गरज आहे हे समजणे गरजेचे असते.
भांडवलाचे दोन प्रकार पडतात:

१. स्थिर भांडवल आणि २. खेळते भांडवल.

उद्योगासाठी जागा, साधनसामुग्री    स्थिर भांडवलम्हणतात.  या उद्योगासाठी
जास्त भांडवलाची आवश्यकता आहे तेन्ह्वा रोख स्थिर भांडवलाकडे असतो.

दैनंदिन वापरासाठी ज्या भांडवलाची आवश्यकता असते त्यास खेळते भांडवल
म्हणतात. उदाहरणार्थ कामगारांचा पगार, वीज पाणी, मार्केटिंग वरील खर्च,
मशिनच्या दुरुस्तीवरिल खर्च.

उद्योगासाठी किती स्थिर आणि भांडवलाची आवश्यकता आहे हे आपल्याला माहित
असणे आवश्यक आहे.

 वित्त उभारणीसाठी विविध पर्याय:
१. खासगी गुंतवणूक
आपले मित्र, आपली बचत किंवा आपले  यांच्याकडून पैसे घेऊन सुरु करण्याची
युक्ती आपल्याला माहित आहे.  बर्याच  आपल्या माणसांच्या उप्कारांवर
आधारित राहाण आवडेलच असेनाही. त्यामुळे  असा पर्याय आपण पाहू शकतो पाहू
शकतो.

एंजल गुंतवणूकदार
त्यांना एंजल गुंतवणूकदार असे म्हणतात. श्रीमंत अशी  विविध उद्योगांमध्ये
(स्टार्ट अप) मध्ये गुंतवणूक करतात. तुमच्या उद्योगात ते सक्रिय सहभागही
घेऊ शकतात. मात्र त्यांना संपूर्ण व्यवसाय पटणे आवश्यक आहे.

असे गुंतवणूकदार तुमच्या आसपासही तुम्हाला आढळू शकतात. किंवा तुम्ही
इंडियन  एंजल नेटवर्क या संस्थेमध्ये नोंदणीकृत होऊ शकता.

व्हेन्चर केपिटल
त्याचप्रमाणे व्हेन्चर केपिटल हा संस्थात्मक पर्याय उपलब्ध आहे. मात्र
एंजल गुंतवणूकदार हे व्यक्तिगत असल्याने  तुनेने सोप्पे असते. व्हेन्चर
केपिटल ना आपला व्यवसाय पूर्ण पटवून देणे गरजेचे आहे.

अय्सिअय्सिआय व्हेन्चर केपिटल फंड
मुंबई व्हेन्चर केपिटल फंड.
अधिक माहितीसाठी: व्हेन्चर इंतेलीन्जंस या संस्थेकडे माहिती उपलब्ध आहे.

२. कर्ज उभारणी
बँकेतून  कर्ज असल्यास लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि बिझनेस लोन असे
आहेत. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये तुमच्या राहत्या घरावर किंवा
कुठल्याही स्थावर मालमत्तेवर लोन घेऊन तुम्ही व्यवसायासाठी कर्ज उभारणी
करू शकता. बँक नवीन गाळा घेण्यासाठी किंवा मशिनरी घेण्यासाठी सुद्धा कर्ज
देते. मात्र त्यासाठी २०% तुमचा आर्थिक सहभाग असणे आवश्यक आहे. यामध्ये
तुमची नवीन स्थावर मालमत्ता गहाण ठेवली जाते. कमी रकमेचे कर्ज हवे
असल्यास सोने तारण ठेऊनही कर्ज उचलता येते.

सोने आणि व्यवसाय कर्ज हा उत्तम पर्याय म्हणता येईल.

३. अनुदान
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार उद्योग विकासासाठी अनेकविध
अनुदानांच्या योजना तयार केल्या आहेत. विशेषतः  उद्योगासंठी या योजना
आहेत. बर्याच योजना ह्या बँकेतून घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहेत. म्हणजे
तुम्ही १०%  बँकेतून कर्ज घेऊ शकता. अनुदान मंजूर झाल्यावर बँकेच्या
१५/२५% (जे लागू असेल ते) तेवढे अनुदान शासनातर्फे थेट बँकेत जमा  केले
जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क:
जिल्हा उद्योग केंद्र - मुंबई व ठाणे.
विविध महामंडळांच्या योजना- म्हाडा बिल्डींग, तळमजला, बांद्रा पश्चिम.

व्यवसाय प्रशिक्षण
व्यवसायासाठी  शासनातर्फे विविध प्रशिक्षण योजना राबवल्या जातात.
संपर्क:
१. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
२. मिटकॉन
३. खादी व ग्रामोद्योग विकास केंद्र- कोराकेंद्र, बोरीवली
४. लघु उद्योग विकास केंद्र- साकीनाका, अंधेरी.

उद्योगाविषयी अधिक माहिती हवी असल्यास संपर्क करा:

९९६७७०६१५०
.
bottom of page