top of page

 

फळबागायती आणि भाजीपाला लागवड

 

शेती हा मानवी उत्क्रांतीचा मूलाधार आहे. जगण्यातही सर्वप्रथम माणूस काय करू लागला तर शेती. कारण अन्न हि माणसाची मुलभूत गरज आहे. त्यामुळेच मानवी उत्क्रांतीचा शेती हा साक्षीदार आहे. अर्थातच हजारो वर्षांपासून माणसाच्या ज्ञानात, तंत्रज्ञानात जी भर पडत गेली, तशी शेतीही बदलली. आता शेतीचे केवळ निसर्गावर अवलंबून असण्याचे दिवस बहुतांशी संपले आहेत आणि तंत्रज्ञानाने पुष्कळ आहे. अर्थात या विकासाचा केंद्रबिंदू अधिकाधिक उत्पादन हा आहे. याच प्रवासात इतर पिकांबरोबर फळे आणि भाजीपाल्याची लागवड हे एक विशेष क्षेत्र म्हणून विकसित झाले. आज फळबाग लागवड आणि भाजीपाला लागवड फार मोठी संधी म्हणून शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. 

 

फळे आणि भाजीपाला हे एक उत्तम उत्पन्न देणारे पिक आहे. पारंपारिक शेतीमध्ये भात गहू याबरोबर तोंडली वगैरे लागवड केली जाते. उपलब्ध जमिनीतून अधिकची पिके काढून उत्पन्न वाढवण्याकडे शेतकऱ्याचा काळ असतो. मात्र सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात फाल्बागायात आणि भाजीपाला हे विशेष प्राविण्य क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे. इतर कुठल्या पिकाबरोबर जोड पिक म्हणून न घेता, केवळ फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढत आहे. याच विषयी थोडीशी माहिती आपण घेऊ. 

 

फळबागायत 

फळे हा आपल्या दैनंदिन आहाराचा भाग आहे. आपण भारतीय केळी ,सफरचंद, संत्री मोसंबी चिकू, पेरू, पेर अशी फळे खातो. त्याच बरोबर काही परदेशी बनावटीची फळेही मिळतात. आंबा हे आपले विशेष आवडीचे फळ. कोकणातील फणस, काजू हि विशेष फळे. कोकण आंब्यासाठी विदर्भ संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. या सर्व विभागांना आपापल्या प्रदेशातील फळांची शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक विकसित करता येऊ शकते. फाल्बागायातींचे हेच तंत्रज्ञान आअपन शिकले पाहिजे. 

 

हरित गृहे (ग्रीन हाउस)

शेती पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे हे आपले आवडते वाक्य आहे. मान्सून हा भारतीय शेतीचा आधार आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र. मात्र या मित्राच्या लहरीपणाचा फटका सुद्धा आपल्याला बसला आहे. त्यामुळे शेतीच्या एकूण विकासापैकी मोठा विकास मान्सून मुले किंवा पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे रोखला गेला आहे असे म्हटले तरी वावगे नाही.

यातूनच हरित गृह हे तंत्रज्ञान विकसित झाले. 

आज महाराष्ट्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. यात खर्च आहे जरूर पण मिळणारा अधिकच फायदा, नियमित आणि हक्काचे उत्पन्न आणि पावसामुळे होऊ घातलेल्या नुकसानापासून होणारा बचाव या मुले हा खर्च खर्च न राहता भांडवली गुंतवणूक बनते. 

 

हरित गृह म्हणजे एखादी बंदिस्त विस्तीर्ण जागा ज्यात नियंत्रित वातावरणात आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केली जाते. हि लागवड फळांची फुलांची व भाजीपाल्याची असते. जागेवरील आच्छादन हे पोलोथिलिन किंवा पोलीकार्बोनेट प्लास्टिक चे असते. काही वेळेस काचेचे सुद्धा आच्छादन केले जाते. यामुळे सूर्यप्रकाश आत येऊ शकतो. 

आतमध्ये वातावरण गरम वा थंड करण्याची यंत्रणा असते.   

 

हरित गृह बांधून देणाऱ्या काही कंपन्या आहेत. त्यांच्याशी बोलणी करून हरित गृहे बांधून मिळू शकतात. 

 साधारणतः प्रती स्क़्वेअर मीटर चा खर्च ७००-७४० असतो. 

 

जैविक तंत्रज्ञान (ओर्गानिक फार्मिंग)

जैविक तंत्रज्ञान हे निसर्गात आढळणाऱ्या विवध वस्तूंपासून खते निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान आहे,. गांडूळ शेती हे याचे उदाहरण आहे. मात्र सध्या अनेक कंपन्या या तंत्रज्ञानाची तयार उत्पादने घेऊन आल्या आहेत. अनेक प्रकारचे जैविक खाते फवारे आणि औषधे उपलब्ध आहेत. 

 

जैविक तंत्रज्ञान अवलाम्ब्ण्यासाठी शासनाच्या योजना आहेत. याबद्दल तालुका कृषी अधिकार्याकडे चौकशी करता येईल. 

 

राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम

राष्ट्रीय फलोत्पादन हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध फळ बगयातींसाठी प्रती हेक्टर प्रमाणे अनुदान मिळते. 

 

जिल्हा कृषी अधिकार्याकडे किंवा तालुका कृषी अधिकार्याकडे या विषयी अधिक माहिती मिळू शकते. 

 

राष्ट्रीय गोदाम आणि शीत गृह साठवणूक 

अधिक प्रमाणात शेतीचे उत्पादन योग्य साठवणूक नसल्याने फुकट जाते. यासाठी उत्तम साठवणूक असणे गरजेचे आहे. 

यासाठी केंद्र सरकारने रास्थरीय गोदाम आणि शीत साठवणूक या दोन योजना आणल्या आहेत. विविध साठवणुकीत प्रमाणात गोदाम व शीतगृहांची बांधणी करता येते. यासाठी केंद्र शासनाचे अनुदान मिळते. 

 

कोकणात विशेषतः या शित्फ्रुहांची आणि गोदामांची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे याविषयात पुष्कळ व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी सुद्धा जोळ कृषी अधिकार्याकडे चौकशी करता येइल. 

 

शिक्षण:

या विषयात शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचे असल्यास कृषी विद्यापीठांकडे पदवी पदव्युत्तर पासून अनेक लहान सहन कोर्सेस उपलब्ध आहेत. 

 

संपर्क: 

डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 

दापोली, रत्नागिरी

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ 

राहुरी, अहमदनगर

 

याशिवाय काही सामाजिक संस्था या बाबतीत कार्य करत आहेत 

कोकण भूमी विकास प्रतिष्ठान

दादर पूर्व मुंबई 

 

अधिक माहितीसाठी संपर्क 

 हर्षद माने, प्रबोधक, जोगेश्वरी पूर्व मुंबई  ९९६७७०६१५०

.

 

 

हॉटेल मेनेजमेंट मधील करिअर संधी

 

हॉटेलिंग हा बहुतांशी लोकांचा आवडता छंद. घरचे खून कंटाळा आला कि, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेल मधले चमचमीत  खाण्यासाठी आम्ही हॉटेल मध्ये जातो. आपल्या सर्वांमध्ये "खवय्ये" नावाची एक जात आहे, ती अशा अनेक ठिकाणी फिरून विविध ठिकाणच्या चवी घेऊन जिभेचे चोचले पुरवीत असते. मग त्यातून अस्सल मालवणी, अस्सल आगरी, वर्हाडी, पंजाबी अशा चवींची रेस्तरो उघडतात. माशांच्या जेवणासाठी, मालवणी, कोल्हापुरी तिखट किंवा शुद्ध शाकाहारी अशा विवध खाद्यप्रकारात अस्सल अशी हॉटेल्स मग लोकप्रिय होतात. या पुढे जाऊन बाहेरील लोकांना राहण्यासाठी हॉटेल्स सोयी पुरवतात. बजेट नुसार मग टू स्टार पासून फ़ाइव्ह स्टार पर्यंत विवध रेंज मिळतात.

मागील काही दशकांपासून जेंव्हा लोकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला, लोकांची हॉटेलिंग ची हौस वाढली हॉटेल या व्यवसायाला विशेष महत्व प्राप्त झाले. स्पर्धा वाढली आणि त्यातून या विषयाचा शास्त्रीय अभ्यास वाढला. यातून हॉटेल मेनेजमेंट या करिअर चा जन्म झाला.हॉटेल किंवा पर्यटन दोन्ही अनुभवसिद्ध करिअर आहेत. तुमचे वेगळे पण हे तुम्ही काय वेगळा आणि चांगला अनुभव तुम्ही देत आहात, यावर तुमचे यश अवलंबून आहे. बर्याच लोकांना चांगले जेवण बनवून खायला घालणे आवडते. काही लोकांना अपरिचित सुंदर ठिकाणी लोकांना घेऊन जाऊन त्यांना आनंद देणे आवडते. तसे तुम्हाला लोकांना उत्तम अनुभव देणे, विश्रांती उत्तम चव देणे विरंगुळ्याचे क्षण देणे आवडते का? याचे उत्तर हो असेल तर हॉटेल मेनेज्मेंट चे क्षेत्र तुम्हाला साद घालेल.हॉटेल मेनेजमेंट म्हणजे काय?एक हॉटेल चालवण्यासाठी सांभाळण्यासाठी ज्या ज्या गोष्ठी करणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टीचा समावेश या अभ्यासात होतो. याचा अर्थ पुस्न्यापासून ते मनेजर पर्यंत सर्व गोष्ठी तुम्हाला कराव्या लागतात. बर्याच मुलांना हा गैरसमज असतो, कि हा अभ्यास केल्यानंतर तुम्ही बर्याच पायर्या टाळून मोठ्या पदांवर गेले पाहिजे. आणि मग अशा मुलांचा भ्रमनिरास होतो, ते खिन्न होतात आणि अभ्यास अर्धवट सोडतात.अभ्यासक्रम:इंस्तीत्युट ऑफ हॉटेल मेनेजमेंट (आयएचएम)भारत शासनाने स्थापन केलेली हि संस्था आहे. अशा एकूण ४१ आयएचएम देशभरात आहेत. मुंबईतील संस्था:मुंबई- वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) , मुंबई-२८ 

बीएस्सी(होस्पिटीलिटी आणि हॉटेल मेनेजमेंट )
 

प्रवेश परीक्षा

जेईई:

जोईंट एन्ट्रन्स एक्सामिनेशन- हि प्रवेश परीक्षा घेतली जाते.
बारावी नंतर कोणीही विद्यार्थी हि प्रवेश परीक्षा दिली जातो.

 

याशिवाय काही अल्प कालावधीचे कोर्सेस

"हुनर से रोजगार तक" या नावाने चालवले जातात.

हाउसकिपिंग ६ आठवडे आठवी पास 

वेटर ६ आठवडे आठवी पास

बेकरी ८ आठवडे आठवी पास   

कुकरी  ८ आठवडे आठवी पास   
 

पदवी पुढे 'हॉस्पिटेलिटी' या विषयात पदव्युत्तर पदवी आणि एम्बिए पदव्या सुद्धा अनेक विद्यापीठे देत आहेत. त्या करून आपण अधिक मोठ्या पडला जाऊ शकतो.
 

इतर काही संस्था:

१. कोहिनूर इंस्तीत्यूट ऑफ हॉटेल मेनेजमेंट :

बी एस्सी इन हॉटेल मेनेजमेंट (मुंबई विद्यापीठ) आणि बीएस्सी इन केटरिंग (यशवंतराव चव्हाण विद्यापीठ) हे दोन पदवी अभ्यासक्रम

शिकवले जातात. याशिवाय बेकरी, बारटेंडरिंग, कुकरी या विषयावर अल्प मुदतीचे सर्तीफिकेट कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत.  

संपर्क: सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८

२. आयटीएम हॉटेल मेनेजमेंट- २५/२६ इंस्तीत्युशनल एरिया, नवी मुंबई

३. कपोल विद्यानिधी, कांदिवली( पश्चिम)

४ अपीजय कोलेज, बेलापूर, नवी मुंबई

५. जी डी आंबेडकर, परेल

६. अथर्व, मालाड मार्वे, चारकोप नाका, मालाड (पश्चिम)

७. सहयोग कोलेज, अंबरनाथ

८. साई श्रद्धा फौंडेशन, अलिबाग

९. रिझवी कोलेज ऑफ मेनेजमेंट,बांद्रा, (पश्चिम)


एम एच सी ई टी (हॉटेल मेनेजमेंट)
महाराष्ट्रातील विवध कोर्सेस मधील प्रवेशा साठी महाराष्ट्र शासनातर्फे हि प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यावर्षीची परीक्षा १८ मी रोजी होईल.
अधिक माहितीसाठी
www.dtemaharashtra.gov.in.


 

हॉटेल मेनेजमेंट नंतर चे विविध करिअर पर्याय:

१. हॉटेल मध्ये नोकरी:
कुकरी अर्थात जेवण बनवण्याच्या अभ्यासानंतर शेफ हा उत्तम पर्याय आहे. संजीव कपूर मुले शेफ हे क्षेत्र घराघरात पोहोचला आहे. या क्षेत्रात दुसर्याला जेवण देण्याचा आनंद आणि पैसा दोन्ही आहे.

वेटर आणि बार टेन्डरिंग हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत. वरकरणी वाटताना आम्हाला हे दोन्ही पर्याय खालच्या दर्जाची कामे वाटतात. मात्र, पंचतारांकित हॉटेल मध्ये वेटर व बार टेन्डरिंग हे प्रतिष्ठेचे करिअर पर्याय आहेत.

हॉटेल मधील इतर सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करणे हे हाउसकीपिंग या क्षेत्रात येते.

तिन्ही क्षेत्रात प्रचंड ताण आहे, मेहनत आहे आणि कदाचित अपमान आहे. मात्र तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्पेशिअलय्झेशन केलेत, उत्तमता मिळवलीत इ प्रचंड पैसा आणि सन्मान आहे.

२. स्वयंरोजगार:

आपल्या देशात उत्पन्नाची वाढती पातळी पाहता, आपल्या देशात हॉटेल या व्यवसायाला खूप संधी आहे. या क्षेत्रात साधा ढाबा उघडून पुढे स्वतःचे पंचतारांकित हॉटेल किंवा हॉटेलची चेन उघडल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपले विठ्ठल कामत हे त्यातील नामांकित उदाहरण. यातून प्रेरणा घेऊन मराठी मुलांनी अधिकाधिक हॉटेल मेनेज्मेंट क्षेत्रात स्वयंरोजगार म्हणून आले पाहिजे.

जितक्या प्रमाणात सध्याच्या पंचतारांकित हॉटेल्स मधील रूम्स भरल्या जात आहेत. परदेशी लोक जितक्या प्रमाणात भारतात येत आहेत त्यावरून हे नक्की आहे या क्षेत्राला भरभराटीचे दिवस यापुढे येणार आहेत. त्यामुळे कंबर कसून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करा.

कारण शेवटी सर्व काही पोटासाठीच चाललेले आहे!

महिलांसाठी विशेष करिअर संधी

 

एक स्त्री समाजात अनेक भूमिका वठवते. मुख्य म्हणजे ती आई आहे. तिच्यापासूनच मानव जातीच्या जन्माची सुरुवात होते. त्यामुळे स्त्री सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम असणे हि कुठल्याही राष्ट्राची समाजाची प्राथमिक गरज आहे. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो. या निमित्ताने स्त्रियांसाठीच्या करिअर संधी हा  आज आम्ही आपल्यासमोर आलो आहोत.आर्थिक कणा मजबूत असणे हि कुठल्याही मनुष्याची मुलभूत गरज आहे. दुर्दैवाने आपल्या समाजात पूर्वापार पुरुषाने कमवायचे आणि स्त्रीने घर सांभाळायचे हि प्रथा पडली आहे. स्त्री हि संसार उत्तम सांभाळू शकते. ती नाती सांभाळते, माणसे सांभाळते. काही घरांमध्ये तिजोरीची किल्ली तीचाय्कडे असते व ती असली पाहिजे. मात्र बहुतांशी घरांमध्ये स्त्रीला आर्थिक अधिकार नाकारले जातात. काही ठिकाणी स्त्री स्वतः कचरते. शिक्षण नसल्यामुळे. कमी असल्यामुळे, कमावती नसल्यामुळे स्त्री बुजून वागते. आज महाराष्ट्रातही गावागावात आणि शहरातही काही ठिकाणी हे चित्र आजही पाहायला मिळते. वास्तविक स्त्रीचे अर्थशास्त्र पुरुषापेक्षा चांगले असते, हे अनुभवाने आणि विज्ञानानेही सिद्ध झाले आहे. मात्र, शतकानुशतके, समाजात पडलेल्या या प्रथेमुळे आर्थिक दृष्ट्या स्त्री कमकुवत राहिली आहे.आज परिस्थिती बदलली आणि स्त्रीला गरजेसाठी का होईना घराबाहेर पडणे आवश्यक वाटले. या निमित्ताने तिची घुसमट काही अंशी कमी झाली असेल. स्वतः पैसे कमावल्यामुळे घरासाठी, माहेरच्यांसाठी आणि  खर्च करायला तिला मोकळीक आहे.त्यामुळे स्त्रियांसाठी उपलब्ध असलेल्या करिअर पर्यायांचा विचार आपण या लेखात करू.इथे पहिली गोष्ट स्पष्ट केली पाहिजे कि पुरुष करू शकतात त्या प्रत्येक करिअर क्षेत्रात स्त्रीने आपला ठसा उमटवला आहे. या लेखाचा उद्देश अशा काही करिअर पर्यायांची चर्चा करणे आहे, जे स्त्री पुरुषांपेक्षा हि अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते. स्त्रीच्या मानसिक जडण-घडणीमुळे आणि तिच्या सचोटी मुळे ती या क्षेत्रांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकते…

 

 

 

१. मानसशास्त्र (सायकोलोजी)

स्त्रीच्या मानसिक आणि बौद्धिक विकासात हळुवारतेचा आणि मानवी भावना आणि संबंध समजून घेण्याचा पैलू पुरुषापेक्षा जास्त विकसित होत असतो. त्यामुळे मानस शास्त्र या विषयात पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक यश मिळू शकते. काही स्त्रिया या पर्यायाचा विचार करतातही. मात्र, बहुतेक मुलींना ह्या क्षेत्राची फारशी माहिती नसते. हे विशेष प्राविण्याचे क्षेत्र असल्यामुळे आर्ट्स आणि बारावी नंतर सर्व विषय मानस शास्त्र घेऊनच पदव्युत्तर पदवी करणे अधिक श्रेयस्कर आहे. त्यामुळे मानसशास्त्र विषयातील करिअर संधी आणि त्यातील अनेक पैलू हे दहावी पर्यंतच मुलींच्या वाचनात आणि जाणीवेत येणे गरजेचे आहे.
 

मानस शास्त्र विषयातहि अनेक पैलू आहेत.
त्यात महत्वाचे:

१. क्लिनिकल सायकोलोजी
२. कौन्सिलिंग मानसशास्त्र

३. सामाजिक मानसशास्त्र

४. औद्योगिक मानस शास्त्र

५. क्रीडा मानस शास्त्र

अगदी या पलीकडे पर मानस शस्त्रासारखा विषयही घेत येऊ शकेल.
 

मानसशास्त्राच्या पर्यायांचा आणि त्यातील विषयांचा विचार एखाद्या वेगळ्या विषयात करता येऊ शकेल. मात्र या लेखात एवढे सांगणे आहे, कि मुलींनी विशेह्स्तः दहावी बारावी नंतर या विषयाचा गांभीर्याने विचार करावा.
 

किंबहुना सद्यस्थितीत समाजाचे भरकटणारे समाजमन सावरायला अधिक महिला मानसशास्त्र तज्ञांची आवश्यकता आहे.

या विषयातील अभ्यासकांना प्राध्यापक, संशोधक आणि अनेक उद्योगांमध्ये सल्लागार पदांच्या  संधी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त अनेक हॉस्पिटल मध्ये आणि कंपन्यांमध्ये संधी आहेत. स्वतःची वेगळे सल्ला केंद्रही सुरु करता येते आणि यात अनेक विषयांमध्ये सल्लागार होता येते.

 

शिक्षण:

पदवी

रुपारेल कॉलेज, माटुंगा

रुईया कॉलेज, माटुंगा
 

एम ए (सायकोलोजी)

एम फील

पी एच डी
 

अप्लाईड सायकोलोजी  दिपार्तमेंत

मुंबई विद्यापीठ

कालिना, सांताक्रूझ

 

२. तत्वज्ञान

भारत हा तत्वज्ञानाच्या बाबतीत जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांमधील एक निश्चित आहे. वेद कर्त्यांपासून ते स्वामी विवेकानंद आणि अरुबिन्दो स्वामींपर्यंत आपल्या देशाला तत्त्वज्ञांची फार मोठी परंपरा लाभली आहे.
 

या वारशाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि त्यात भर टाकणारे संशोधन करण्याचे कार्य तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांचे असते. तत्वज्ञान हा केवळ एक विषय नसून अति भौतिकवादी आणि संहारक अभिलाषावादी जगाला सावरण्याची महत्वाची जबाबदारी या विषयाचं अभ्यासकांची आहे आणि येणाऱ्या काळात ती वाढत जाणार आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक स्त्रियांनी या विषयाकडे येन अधिक गरजेच आहे. स्त्री हि अधिक सूत्रबद्ध आणि शांत सारासार मनोवृत्तीत विचार करू शकते. त्यामुळे तत्वज्ञानाच्या अंगाने विश्वाला समर्थपणे सावरण्याची महत्वाची जबाबदारी येणाऱ्या काळातील तत्त्वज्ञांची असणार आहे आणि महिला अधिक सक्षमपणे हि जबाबदारी पार पडू शकतात.
 

या विषयासाठी सुद्धा बारावीपासून पूर्ण विषय तत्वज्ञानासकट पदवी आणि पुढे पदव्युत्तर होणे गरजेचे आहे.
 

या विषयातील अभ्यासकांना प्राध्यापक, संशोधक आणि अनेक उद्योगांमध्ये सल्लागार पदांच्या  संधी उपलब्ध आहेत.
 

3. समाजसेवा अभ्यास

समाजसेवा हा स्त्रियांचा स्थायीभाव. इतरांना मदत करणे त्यांना फार आवडते. त्यामुळे याच विषयात त्यांना करिअर करणे अधिक रुचिकर होऊ शकते. समाजसेवेसाठी बर्याच विद्यापीठांकडून समाजसेवेत पदव्युत्तर पदवी (एम एस डब्ल्यू ) प्रदान केली जाते.

 

या क्षेत्रात सामाजिक संस्थांमध्ये, तसेच अनेक सरकारी नोकर्यांच्या सुद्धा संधी उपलब्ध आहेत.

 

निर्मला निकेतन कोलेज

१) न्यू मरीन लाईन्स, चर्चगेट (पूर्व) ०२२-२२००२६१५
२) सेंट पियास कॉलेज, आरे रोड, गोरेगाव (पूर्व) ०२२-२८७४२२८४

 

टाटा इंस्तीत्युत ऑफ सोशिअल सायन्स

व्ही एन पुरव मार्ग, देवनार, मुंबई - ०२२-२५५२५०००

येथे समाज  सेवा विषयातीलही अनेक उप-विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उपलब्ध आहेत.

पूर्ण वेळ अभ्यासक्रमाबरोबर पदवी झालेल्या आणि सध्या घरी असलेल्या महिला ज्यांना पुन्हा घराबाहेर पडायचे आहे, त्या अर्धवेळ आणि दूरस्थ पद्धतीने असणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम  करू शकतात.
 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

मुंबई कार्यालयमुख्याध्यापक भवन, प्लॉट नं ६ब  रोड नं २४सायन मुंबई ४०००२२०२२-२४०९०४०८

 

४. महिला अभ्यास

महिलांच्या सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणारे महिला अभ्यास हे एक स्वतंत्र क्षेत्र अस्तित्वात आले आहे. सामाजिक अभ्यासाच्या मार्गे जाणारे हे क्षेत्र महिलांच्या महिलांच्या विशिष्ट प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते.
 

पुणे विद्यापीठ

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला  अभ्यास केंद्र

डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन

पुणे विद्यापीठ गणेश खिंड रोड

पुणे ४११००७

०२०-२५६०१३००/२५६९००५२

 

येथे महिला अभ्यास विषयात पदव्युत्तर पदवी आणि सर्तीफिकेत कोर्सेस उपलब्ध आहेत.

 

टाटा इन्स्तिट्युट
व्ही एन पुरव मार्ग, देवनार, मुंबई - ०२२-२५५२५०००

 

महिला हा कुठल्याही समाजाचा कणा आहेत. तो जितका मजबूत असेल, तितकीच समाजाची वीण घट्ट  असते. यासाठीच आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम असणे गरजेचे आहे.

 इतर उपलब्ध अनेक क्षेत्रांप्रमाणे वर उल्लेख लेली क्षेत्रे महिलांना काम करण्यासाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतात.
 

येणाऱ्या काळात महिलांनी आणि आपल्या देशाने सशक्त होण्यासाठी अधिकाधिक महिलांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे.
 

सर्व महिलांना जागतिक महिला दिना निमित्त शुभेच्छा !

bottom of page