top of page

 

भांडवली बाजारातील करिअर 

 

 

कॉमर्स मध्ये प्रवेश घेतलेल्यांना करिअरचे जणू आगरच खुले होते. यातीलच एक फार मोठे क्षेत्र म्हणजे भांडवली बाजार. या क्षेत्रात कितीतरी उपक्षेत्रे आहेत. त्या मध्ये करिअर करण्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. या सर्व संधींची माहिती या लेखामध्ये. 

 

भांडवल बाजार म्हणजे काय?

 

गुंतवणूकदारांकडे असलेला पैसा जो बचतीच्या मार्गाने साठवला जातो त्याला, उद्योगपतींच्या आणि नवउदयोजकांच्या आवश्यक्तेसाठी उपलब्ध करून देण्याचे काम ज्या बाजारात, केले जाते त्याला भांडवल बाजार असे म्हणतात. थोडक्यात दीर्घ कालावधीसाठी पैसा उपलब्ध होण्याचे ठिकाण म्हणजे भांडवल बाजार. 

 

ज्या वेळेस एखाद्या कंपनीला भांडवल उभे करायचे असते त्यावेळेस तिला कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागतो. या कार्य्देशीर गोष्टींवर लक्ष ठेवण्याचे काम सेबी हि शासनाची संस्था करते. या कंपनीमध्ये सामान्य नागरिकांचा पैसा गुंतणार असतो, त्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा म्हणून भांडवल बाजारामढील नियम कडक आहेत. 

 

पैसा उभा केल्यानंतर कंपनीला एखाद्या शेअर बाजारात नोंदणीकृत व्हावे लागते. शेअर बाजारात सर्व नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्स ची उलाढाल चालते. त्यामुळे गुंतवणूकदारांना अपरिमित काळासाठी कंपनीमध्ये आपला पैसा गुंतवून ठेवावा लागत नाही. याचाच अर्थ, पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार कंपनीची नोंदणी झाल्याच्या पहिल्या दिवशी आपली सर्व गुंतवणूक विकू शकतो. 

 

या भांडवल बाजाराचे अनेक पैलू आहेत. त्यामुळे यामध्ये अनेकविध संधी उपलब्ध होतात.  ज्यांचा विचार या लेखामध्ये आपण करणार आहोत. 

 

१. मर्चंट बँकर 

 

मर्चंट बँकर हि एक कंपनी असते, जी पब्लिक इश्यू आणण्यासाठी कंपन्यांना मदत करते. या मर्चंट बँकर्स चे तीन भाग पडतात. हे मर्चंट बँकर सेबी कडे नोंदणीकृत असतात, त्यामुळे सेबीचे यांच्यावर नियंत्रण असते. त्याचा उपयोग हा होतो, कि पब्लिक इश्यू आणणाऱ्या कंपन्यांवर सेबीची नजर राहते. अर्थात प्रोस्पेकट्स सेबी कडून मंजूर झाल्यानंतरच पुढे जाते. त्यामुळे मर्चंट बँकर पब्लिक इस्श्यू चा महत्वाचा भाग आहे. 

 

म्हणून सेबी कोणालाही मर्चंट बँकर म्हणून नोंदणी देत नाही. त्याचे काही निकष आहेत. 

 

या मर्चंट बँकर कडे कितीतरी विविध प्रकारच्या व्यावसायिकांची आवश्यकता असते. यामध्ये फायनन्स मध्ये एमबीए केल्यावर, तसेच कंपनी सेक्रेटरी केल्यावर चांगली संधी उपलब्ध होते. 

 

२. कंपनी सेक्रेटरी 

 

आपण कंपनी सेक्रेटरी पदाचा सखोल विचार मागील एका लेखात केला होता. वर म्हटल्याप्रमाणे भांडवली बाजारातील नियम आणि कायदे कानू फार क्लिष्ट आणि गंभीर आहेत. त्यामुळे कंपन्यांना एका अशा व्यावसायिकाची गरज असते जो केवळ याच विषयातील निष्णात असेल. अशी व्यक्ती म्हणजे कंपनी सेक्रेटरी. 

पब्लिक इश्यू आणणाऱ्या कंपनीला कंपनी सेक्रेटरी ची आवश्यकता असते त्याच प्रमाणे मर्चंट बँकर्स ना कंपनी सेक्रेटरी ची आवश्यकता असते. 

 

३. स्टोक ब्रोकर 

कंपनी नोंदणीकृत झाल्यावर तिच्यामध्ये गुंतवणूकदारांना शेअर बाजारामार्फत गुंतवणूक करता येते. ती अर्थात स्टोक ब्रोकर मार्फतच करता येते. त्यामुळे स्टोक ब्रोकर हि महत्वाची व्यक्ती आहे. हि वास्तविक एक कंपनी असते. 

 

सोर्क ब्रोकरकडे बोल्ट वर बसण्यासाठी पदवीधरांची-कॉमर्स असल्यास उत्तम आवश्यकता असते.

 

४. टेक्निकल एनालिसिस 

शेअर बाजारामध्ये होणार्या उल्थाप्ल्ठींचे परिणाम शेअर निर्देशांक आणि कंपन्यांचा भावावर पडतात. याचे काही नियम आणि थोतले बांधून त्यावर काम करणार्यांना टेक्निकल अनालीस्त म्हटले जाते. हे अतिशय प्रतिष्ठेचे क्षेत्र आहे. 

 

५. सब ब्रोकर 

प्रत्येक स्टोक ब्रोकरचे अनेक सब ब्रोकर असतात. इथे स्वयंरोजगाराची उत्तम संधी उपलब्ध होते. 

सब ब्रोकर होण्याकरिता, तुम्हाला ब्रोकर कडे आणि सेबी मध्ये सुद्धा नोंदणी कृत व्हावे लागते. 

 

६. क्रेडीट रेटिंग 

क्रेडीट रेटिंग म्हणजे तुमचा इश्यू किंवा तुमची कंपनी गुंतवणुकीसाठी किती सुरक्षित आहे याचे केलेलेमुल्यमापन. हे मुल्यमापन करण्यासठी निष्णात कंपन्या काम करतात आणि त्या सेबी कडे नोंदणीकृत असतात. त्यांना क्रेडीट रेटिंग एजन्सी असे म्हणतात. 

 

या कंपन्यांमध्ये सुद्धा एमबीए फायनान्स, कंपनी सेक्रेटरी, सीए तसेच क्रेडीट किंवा रिस्क वाय्वास्थापन केलेल्या निष्णात व्यक्तींची आवश्यकता असते. 

 

७. रिसर्च अनालीस्त 

प्रत्येक कंपनी तिच्या समभागाची बाजारावरील माहिती आणि त्या अनुषंगाने विश्लेषण करण्यसाठी तज्ज्ञ वायाक्तींची आवश्यकता असते. त्यासाठी रिसर्च अनालीस्त किंवा इक्विटी अनालीस्त असतात. 

 

एकंदरीत भांडवली बाजारातील विविध उप क्षेत्रांची आपण ढोबळ माहिती घेतली. आता त्यासाठी शिक्सःन किंवा प्रशिक्षण कुठे उपलब्ध आहे ते पाहू. 

१. एमबीए फायनान्स - फायनान्स विषयात एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी चांगल्या संठेकडून मिळवली असल्यास उत्तम

२. सीएस- कंपनी सेक्रेटरी इंस्तीत्युत - www.icsi.edu 

३. सीए- चार्टर्ड अकौंटन्ट इंस्तीत्युत 

४.  एलएलबी- मुंबई विद्यापीठ 

५. एलएलएम (बिझनेसकायदा)- मुंबई विद्यापीठ 

६. मास्टर ऑफ बिजनेस लो- नेशनल लो स्कूल, बंगलोर

७. सीएफए 

८.  सीआरएम- रिस्क व्यवस्थापन  

हे सर्व मोठे कोर्स आहेत.  

 

यावय्तिरिक्त खालील कोर्सेस उपलब्ध आहेत. 

मुंबई शेअर बाजार

मुंबई शेअर बाजारात टेक्निकल अनालिसिस, आयपीओ असे अनेक लघु तसेच केपिटल मार्केट मधील पदव्युत्तर पदवी, फायनान्स आणि गुंतवणुकीतील पदव्युत्तर पदवी असे मोठे कोर्सेस उपलब्ध आहेत. 

 

अधिक माहिती

मुंबई शेअर बाजार इंस्तीत्युत, दलाल स्ट्रीट, चर्चगेट 

 

नेशनल स्टोक मार्केट 

नेशनल शेअर बाजाराचे अनेक लघु कोर्सेस उपलब्ध आहेत. यामध्ये स्टोक क्रोकर सब ब्रोकर साठी तसेच क्रेडीट रेटिंग, रिस्क मेनेज्मेंत अशा विषयांवरहि सर्तिफाइड कोर्सेस उपलब्ध आहेत. 

अधिक संपर्क 

नेशनल स्टोक मार्केट, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. 

 

रिसर्च अनालीस्त 

रिसर्च अनालीस्त आणि क्रेडीट रेटिंग विषयावर विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. विविध व्यवस्थापन शाळांमध्ये हे कोर्सेस उपलब्ध होऊ शकतात. 

 

आपण या बाजाराची थोडक्यात माहिती घेतली.यात प्रवेश केल्यावर हे क्षेत्र किती विस्तीर्ण आहे हे लक्षात येते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत. कॉमर्स आणि व्यवस्थापन करण्यारायंनी या क्षेत्राचा विचार जरूर करावा!

 

मोडेलिंग

 

 

नवीन काळानुसार काही नवीन करिअर्स निर्माण झाली आहेत.  केवळ गरजच निर्माण झाली आहे असे नव्हे, तर त्यात खूप पैसा आणि प्रतिष्ठाही आहे. मोडेलिंग हे असेच एक मोठे करिअर. मोठे पण अतिशय आव्हानात्मक आणि त्यातूनही महत्वाचे म्हणजे प्रचंड स्पर्धात्मक. एका नवीन वेगळ्या करिअर संबंधी. 

 

दुष्टीकोन

मोडेलिंग कडे बर्याच लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही स्वतःच्या शरीराचे प्रदर्शन असा आहे. मात्र ते फार चुकीचे आहे. स्वतःला लोकांसमोर आकर्षक मार्गाने प्रस्तुत करणे हि एक कला आहे. कुठल्याही बीभत्स अश्लील मार्गांचा वापर न करताही तुमच्या शारीरिक गुणांमुळे, हास्यामुळे, डोळ्यांमुळे, किंवा लोभस व्यक्तिमत्वामुळे तुम्ही समोरच्यावर आपली छाप पडू शकलात, त्यांना खिळवून ठेऊ शकलात कि तुम्ही मोडेलिंग मध्ये यशस्वी होता. एखाद्या व्यक्तीला आपल्याला टीव्ही वर पाहणे आवडते, कधी तिचा आवाज कधी तिचा चेहरा तर कधी एकंदर त्या मह्साची ठेवण आपल्याला आकर्षित करते. मोडेलिंग मध्ये तुम्हाला करिअर करायचे असेल तर तुम्हालाही असेच काही करावे लागेल. 

 

कुठे संधीअसते :

१. मोडेल- फेशन शो, मेग्झीन्स, कपड्यांच्या जाहिरातीतील मोडेलिंग

२. व्यावसायिक उत्पादन- जाहिराती. प्रोडक्ट लॉंच मध्ये 

३. अभिनय - टीव्ही, सिनेमा. 

 

मोडेलिंग मधील स्ट्रगल

मोडेलिंग आणि अभिनय किंवा कला या गोष्टीत खूप स्ट्रगल सुरुवातीच्या काळात आहे. या क्षेत्रात येणार्याने त्याची मानसिक तयारी केलीच पाहिजे. मात्र स्ट्रगल मध्ये येणाऱ्या अपयशामुळे, कडवट अनुभवांमुळे आपण निराश होऊन चालणार नाही. स्ट्रगल आहे कारण खूप स्पर्धा आहे. सुंदर दिसणाऱ्या कित्येक मुली किंवा उत्तम शरीरसौष्टव असणारी आणि आकर्षक मर्दानी व्यक्तिमत्वाची कित्येक मुले या करिअर मध्ये येण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे इंडस्ट्री कडे तुमच्यापेक्षा वेगळे असे अनेक पर्याय आहेत. पण ते फक्त सुरुवातीच्या काळात, जेंव्हा तुम्हाला ओळख नाही, चेहरा नाही. एकदा का तो बनला कि अनेक स्पर्धा तुम्ही मागे टाकून पुढे जाता. तोपर्यंत अपयश, नकार किंवा एखादा अपमानही खुल्या दिलाने अन क्रीडात्मक भावनेने स्वीकारला पाहिजे. 

बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांनाही सुरुवातीच्या काळात अपमान सहन करावा लागला होताच की! मात्र जंजीर नंतर कोणाची टाप होती त्यांना काही बोलण्याची!

 

वाईट सवयी व संगती

एक गोष्ट जी प्रकर्षाने पाळली गेली पाहिजे ती म्हणजे वाईट सवयी आणि वाईट सांगत यांच्यापासून कटाक्षाने लांब राहिले पाहिजे. काम मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही. आपले पूर्ण लक्ष आपले काम, आपली प्रगती आणि ज्या जोरावर आपण यशस्वी होतो आहोत त्या आपल्या व्यक्तिमत्वाकडे असली पाहिजे. यासाठी कुठल्याही वाईट संगती किंवा सवयी जसे व्यसन, जागरणे, अवेळी अन्न इ. स्वतःला लाऊन घेऊ नयेत. विशेषतः या क्षेत्रात नसणाऱ्या मित्र मैत्रिणींबरोबर राहून अशा सवयींच्या आहारी अजिबात जाऊ नये. काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. 

 

चांगल्या सवयी

व्यायाम, योग, उत्तम आहार यांच्या सारख्या चांगल्या सवयी मात्र अजिबात सोडू नयेत. खूप थकवणारी कामे एकामागून एक घेऊ नयेत, किंवा दोन कामांच्या मध्ये चांगला ब्रेक घ्यावा. स्वच्छ वातावरणात अधिक राहण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या न्युट्रीशन कडे तुम्ही जाऊ शकत असल्यास उत्तम. एखादा योगा प्रशिक्षक असावा. मुलींसाठी ब्युतिशिअन असावी जी चेहऱ्याच्या योग्य काळजीसाठी वेळोवेळी सल्ला देऊ शकेल. प्रत्येक ठिकाणी खूप खर्च करण्याची गरज नसते. सुरुवातीच्या काळात तुम्हाला खर्च जमणार नाही. पण काही गीष्टी या स्वतःतील गुंतवणूक म्हणून कराव्यात. 

 

शिक्षण:

मोडेलिंग साठी काय करणे आवश्यक आहे याचे पारंपारिक शिक्षण उपलब्ध नाही. काही खासगी संस्था या बाबतीत कोर्स देत असतील. मात्र तो करण्याची गरज असतेच असे नाही. सिनेमा, केमेरा, लोकांसमोर विश्वासाने सदर होणे, या कला विश्वास आपल्यात निर्माण होण्यासाठी असा एखादा कोर्स करता येऊ शकतो. 

अभिनयाचे शिक्षण तुम्ही घेऊ शकता. तसे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठ, कालिना, सांताक्रूझ अभिनयातील कोर्स चालवते. 

त्याचप्रमाणे वाचाशुद्धी किंवा आवाज या विषयावर एखादा कोर्स करावा. 

 

तेंव्हा सज्ज व्हा अतिशय आवाहनात्मक आणि प्रकाशझोतातील करिअरसाठी! खूप मोठी संधी यात नेहमीच खुणावत राहील!

 

 

 

 

गाण्यातील करिअर

 

महाराष्ट्र हा कलेचा भोक्ता आहे. कलेवर मराठी माणूस प्रेम मनापासून प्रेम करतो.  त्यातही गाण्यावर महाराष्ट्राने अतोनात प्रेम केले आहे. महाराष्ट्रात गाण्याची  परंपरा आहे, गाण्याचे असंख्य प्रकार आहेत आणि ज्यांनी  क्षेत्रात देशभरातच नव्हे तर जगभरात नाव कमावले अशी श्रेष्ठ मंडळी या महाराष्ट्राने देशाला दिली आहेत. 

 

अगदी उत्तर भारतात जन्माला आलेल्या अभिजात शास्त्रीय संगीताला महाराष्ट्राने अनेक पैलू पाडले, त्यातून नाट्यसंगीत हा एक नवीन आणि अस्सल बावनखणी नाट्यप्रकार जन्माला घातला. भावगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय प्रकारामध्ये महाराष्ट्राने अनेक हिरे दिले आहेत. 

 

 गायन कलेला आणि गायकांना महाराष्ट्रात सन्मानाचे स्थान आहे. त्यामुळेच तुम्हाला आवाजाची देणगी लाभली असेल तर, या क्षेत्राचा करिअर म्हणून अवश्य विचार व्हावा. याचसाठी आजचा हा लेख.  

 

गायनकलेतील संधी 

एक काळ होता जेंव्हा कलेतील क्षेत्राकडे  फारश्या प्रतिष्ठेने पहिले जात नव्हते. त्यानंतर चित्र बदलले. अनेक चांगली मंडळी या क्षेत्राकडे वाळू लागली. या क्षेत्रात पैसा, प्रतिष्ठा आणि मुख्य म्हणजे स्थैर्य आले. 

 

गायन कलेमध्ये करिअर चा विचार करायचा झाल्यास खालील प्रकारांमध्ये विचार करता येईल.

१. शास्त्रीय संगीत 

 

शास्त्रीय गायन सर्व गायन कलेचा पाया आहे.  महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताला फार मोठी परंपरा आहे. मोगुबाई हर्डीकर, केळुस्कर, बालगंधर्व, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी ते आज अश्विनी देशपांडे, राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, भरत बलवल्ली पर्यंत नाव आहेत. 

 

 तुमच्या गायन क्षेत्राची सुरुवात शास्त्रीय संगीतानेच होणार आहे.  मात्र अनेक कलाकार शास्त्रीय संगीत शिकून करिअर मात्र सुगम किंवा चित्रपट गीतांमध्ये करतात. 

 

मात्र कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेहुंडी, किशोरी ताई अमोणकर यांनी शास्त्रीय संगीतामध्ये फार चांगले करिअर करता येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. आता गाण्याच्या मैफिली कमी झाल्या असल्या तरी सवाई गंधर्व, वसंतोत्सव सारखे कार्यक्रम आणि विविध मैफिली कार्यक्रम होतात.तसेच विविध म्युजिक कंपन्या शास्त्रीय संगीताच्या सीडी काढत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातच प्राविण्य मिळवून  बनवता येईल. 

 

२. सुगम संगीत 

 

अन्यथा सुगम संगीत, भक्तिगीते  या क्षेत्रात काम करता येईल. पंडित भीमसेन जोशींनी शास्त्रीय संगीतातूनच भक्तिगीतांचा अनमोल नजराणा रसिकांना रसिकांना दिला. चित्रपट गीतान्मध्येही चांगले करिअर करता येण्यासारखे आहे. 

 

३. आकाशवाणी, दूरदर्शन 

आकाशवाणी, दूरदर्शन येथे गायक म्हणून रुजू होता येईल. पूर्वीचे कित्येक कलाकार आकाशवाणीतूनच आले आहेत. 

 

शिक्षण 

गुरुकुल शिक्षणाची फार मोठी परंपरा भारतात आहे. अर्थात आजच्या काळात तुम्हाला असे शिक्षण मिळणे दुरापास्त आहे. 

 

गंधर्व विद्यालय

गंधर्व विद्यालयातर्फे गांधर्व परीक्षा घेतली जाते. प्रारंभिक पासून ते विशारद पर्यंत सात वर्षांच्या परीक्षा असतात. विशारद मिळाल्यावर संगीत क्षेत्रात पदवी मिळवल्याप्रमाणे मानले जाते. 

 

संगीत शिकवणारे कितीतरी शिक्षक उपलब्ध आहेत. 

तुम्ही विविध संगीत शिकवणाऱ्या संस्था आणि विविध शिक्षकांकडे जाऊन या परीक्षेला बसू शकता. 

अधिक संपर्क 

 प्रबोधक: हर्षद माने ९९६७७०६१५०. 

 

पारंपारिक शिक्षण 

मुंबई विद्यापीठ 

 

मुंबई विद्यापीठात संगीत क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी कोर्स उपलब्ध आहेत. याशिवाय हिंदुस्तानी क्लासिकल, सुगम संगीत, तबला आणि सितार विषयातील पदविका आणि म्युजिक कम्पोसिशन मधील मधील सर्टीफिकेट कोर्स सुद्धा आहे. 

 

संपर्क:

संगीत डिपार्टमेंट, विद्यापीठ विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट. 

 

मुजिक अकादमी

काही विशेष म्युजिक अकादमी प्रसिद्ध आहेत. 

१) सुरेश वाडकर आजीवसन म्युजिक अकादमी, जुहु रोड, सान्ताक्रुज पश्चिम 

संपर्क: ०२२-२६६०७७३१

२) पंडित जसराज अकादमी, ओशिवरा लिंक रोड, अंधेरी पश्चिम

संपर्क- ०२२-६५६११५३५

३) मिलिंद इंगळे अकादमी, विलेपार्ले- ०२२-२६६३०३००  

४) रचना संसद, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी. 

 

नाट्यसंगीत

विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठान नाट्य संगीत या विषयात पदविका कोर्स घेते. 

संपर्क- शुभदा दादरकर- ९८६९०६७७७८

 

तेंव्हा तुम्हाला संगीतात विशेषतः गायन क्षेत्रात करिअर करायचे असेल तर पुढे या, आणि या अतिशय  अभिजात संस्कृतीचा भाग व्हा!

bottom of page