top of page
image.png
" मला असा तरुण हवा आहे, ज्याचे शरीर आणि मन लोखंडाच्या कांबीसारखे असेल...."

                              स्वामी विवेकानंद

प्रबोधक ध्येय

येणाऱ्या काळात भारत विश्वाचे नेतृत्व करेल.  अशा विश्वविजेत्या भारताचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राला आणि मराठी तरुणांना सक्षम करण्यासाठी प्रबोधक प्रयत्नशील आहे... 

यासाठी ​काय करावे लागेल?

अधिकाधिक मराठी तरुण प्रशासकीय सेवा आणि शासकीय नोकऱ्यांद्वारे केंद्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणांमध्ये शिरावा

अधिकाधिक मराठी तरुण केंद्रीय आणि 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम शैक्षणिक

संस्थांमध्ये जावा

 

अधिकाधिक मराठी तरुण उद्योजक व्हावा आणि त्याच्या उद्योगाचे साम्राज्यात रूपांतर व्हावे...  

अधिकाधिक मराठी तरुण सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, कला. विज्ञान या क्षेत्रांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चमकावा

अधिकाधिक मराठी तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकऱ्या, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रांत जावा

Shivaji%20maharaj%20shadow_edited.png

महाराष्ट्र

सक्षम 

महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाशी 'प्रबोधक' जोडलेले असेल. लहान मुले, महिला, शिक्षण, तरुण, करियर, उद्योग, आरोग्य, पाणी, वीज, शेती, प्रशासन, आपत्ती निवारण - महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी- जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर 'प्रबोधक' सज्ज असतील...

२०४० 

प्रबोधक उपक्रम

कोकण विकास 




प्रबोधक कोकण

मित्र अर्ज

१. कोकणच्या शेतीचा विकास, फळे, भाजीपाला, मसाला पिके, भातशेती, फुले, रेशीम इ.- प्रशिक्षण, मार्गदर्शन, वित्त आणि विपणन सुविधा, नाबार्डच्या योजना, केंद्र आणि राज्यशासन योजना आणि पायाभूत सुविधा, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, निधी कंपन्या, मायक्रो फायनान्स इ. 

२. कोकणातील उद्योगांचा विकास: लघु उद्योजकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, वित्त आणि इतर सुविधांची मदत, सिडबी आणि बँकांच्या इतर योजना, उद्योगांसाठीच्या अनुदान योजना  

३.  संस्थात्मक सुविधा: शेती, फलोत्पादन, दूध उत्पादन आणि डेअरी, पर्यटन आणि हॉटेल्स-रिसॉर्ट्स विकास, भाजीपाला, फळप्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्प, मत्स्य प्रक्रिया प्रकल्प, फूड पार्क, कोल्ड स्टोरेज, गोदामे, क्लस्टर, औद्योगिक वसाहती इ. साठी मदत आणि सहाय्य

४. तरुणांसाठी, करियर मार्गदर्शन, उत्तम शाळा आणि कॉलेजेस, अद्ययावत तंत्रज्ञान, इंग्रजी, परदेशी भाषा आणि तांत्रिक-अतांत्रिक स्किल डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा मार्गदर्शन, कोकणच्या विद्यापीठासाठी आणि कोकणातील शिक्षणाच्या विकासाठी प्रयत्न 

५ अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र ,हॉस्पिटल्स आणि सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल्स साठी प्रयत्न, कोकणात एम्स आणण्यासाठी प्रयत्न

६. विविध केंद्र आणि राज्य संस्था, मंडळे, केंद्र आणि राज्याच्या प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठीच्या योजना कोकणात याव्यात यासाठी प्रयत्न

७. जलसंधारण, हरित आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, शुद्ध पाणी इ. साठी प्रयत्न

८. महिला, बाल, वृद्ध आणि सर्व समाजघटकांच्या सामाजिक प्रगतीसाठी आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न

९. कोकणच्या सांस्कृतिक विकासासाठी, कला, क्रीडा क्षेत्रात कोकण आणि कोकणातील तरुण विकसित व्हावा यासाठी प्रयत्न

१०.कोकणात आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत विकसित व्हाव्यात यासाठी शासनाकडे प्रयत्न

नजीकचे उपक्रम

२७ मार्च २०२६

चंदन लागवड” कार्यशाळा उत्साहात संपन्न;

कोकणातील शेतीला नवे दिशादर्शन

दापोली : प्रबोधक संस्था आणि वनशास्त्र महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चंदन लागवड” या विषयावरील कार्यशाळा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेत कोकणातील शेतीसाठी पर्यायी व उच्च मूल्य असलेल्या पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी चंदन लागवडीची तांत्रिक माहिती, लागवडीचे नियोजन, बाजारपेठेतील संधी आणि व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. लातूर येथील महाराष्ट्र चंदन कृषी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अमोल रोनगे यांनी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित मार्गदर्शन करून सहभागी शेतकऱ्यांना व्यावहारिक दिशा दिली.

याशिवाय खैर वृक्ष लागवडीवरील विशेष सत्रही आयोजित करण्यात आले. कार्यशाळेनंतर सहभागींसाठी विद्यापीठातील नर्सरी आणि चंदन लागवडीच्या प्रक्षेत्राची पाहणी आयोजित करण्यात आली, ज्यामुळे प्रत्यक्ष शेतीची समज अधिक दृढ झाली.

 

या कार्यशाळेत वसई ते सावंतवाडी परिसरातील तसेच मुंबईत वास्तव्यास असलेल्या आणि कोकणात शेती करण्याची इच्छा असलेल्या ‘अर्बन शेतकऱ्यांचा’ उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला.

 

कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन शिल्पा राठोड यांनी केले. या उपक्रमामुळे सहभागी शेतकऱ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर शेतीविषयी नव्याने प्रेरणा मिळाली.

 

कोकणातील ओसाड पडलेल्या जमिनींचा योग्य वापर करून चंदन, हळद, मसाला पिके, साग, खैर आणि बांबू यांसारख्या उत्पन्नवाढ करणाऱ्या पिकांकडे वळण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. स्थानिक तसेच मुंबई-पुणे परिसरातील कोकणवासीयांनी या संधींचा लाभ घेतल्यास कोकणच्या विकासाला नवी गती मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

470860.jpg
471514.jpg

प्रबोधक व्हिडीओज

All Videos

All Videos

All Videos
गुंतवणुकीचे बेसिक्स..

गुंतवणुकीचे बेसिक्स..

26:39
मराठी माणसांनी शेअर मार्केट मध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट करावी

मराठी माणसांनी शेअर मार्केट मध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट करावी

14:35
मराठी तरुणांनी सुरु केलेच पाहिजे: किराणा मालाचे दुकान | #BusinessIdeas #MarathiBusiness #Prabodhak

मराठी तरुणांनी सुरु केलेच पाहिजे: किराणा मालाचे दुकान | #BusinessIdeas #MarathiBusiness #Prabodhak

16:32
कोकणात हे तीस उत्पादक उद्योग सुरु झाले पाहिजेत | #Kokan #Businessideas #MarathiBusiness

कोकणात हे तीस उत्पादक उद्योग सुरु झाले पाहिजेत | #Kokan #Businessideas #MarathiBusiness

32:47

प्रबोधक मुंबई गौरव गीत

गीतकार: जयेश मेस्त्री संगीत: हर्षद माने 

गायक: मयूर सुकाळे आणि दीपाली कामत 

पथनाट्य: मराठी शाळा

इंग्रजी काळाची गरज आहे मान्य,

पण त्यासाठी इंग्रजी शाळेतच शिकणे

गरजेचे नाही!

पथनाट्य: संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!

बिदर,कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!

bottom of page